आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडील शिक्षणाचा खर्च पेलू शकत नाही म्हणून शेतकऱ्याच्या १७ वर्षीय मुलीने घेतला गळफास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुस्ते (जि. साेलापूर)- अल्पभूधारक शेतकरी वडिलांची अार्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे ते अापला व बहीण-भावांच्या शिक्षणाचा खर्च पेलू शकत नसल्याच्या वैफल्यातून एका महाविद्यालयीन तरुणीने रविवारी घरात गळफास घेऊन अात्महत्या केली. ईश्वरवठार गावात ही घटना घडली. अनिशा हनुमंत लवटे (१७) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. ती तासगाव येथील पाॅलिटेक्निक महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेत हाेती. 


‘मी गेल्यावर तरी वडील बहीण व भावाला चांगले शिक्षण देऊ शकतील, म्हणून मी जीवन संपवत अाहे,’ असे तिने अात्महत्यापूर्वी चिठ्ठीत लिहून ठेवल्याचे पोलिसांनी सांगितले.


साेलापूर जिल्ह्यातील ईश्वरवठार (ता. पंढरपूर) या गावात हनुमंत काशीनाथ लवटे राहतात. केवळ एक एकर जमीन कसून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. हनुमंत यांना दोन मुली व एक मुलगा अाहे. अनिशा ही दुसरी मुलगी. पॉलिटेक्निकला शिकत होती.  अार्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने या तीनही मुलांच्या शिक्षणाचा खर्च करताना वडिलांची हाेणारी अाेढाताण अनिशाला पाहवत नव्हती. त्यामुळेच तिने रविवारी टाेकाचे पाऊल उचलत घरातच गळफास घेऊन अात्महत्या केली. 

 

बातम्या आणखी आहेत...