आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर: चोरीचे सत्र सुरूच, शहरात दोन ठिकाणी घरे फोडली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - हैदराबाद रोड येथील मंत्री-चंडक आंगन आणि सोरेगाव अमर नगर येथे चोरीच्या दोन घटना घडल्या. यामध्ये सुमारे पाच हजारांचा ऐवज चोरीला गेला. याबाबत एमआयडीसी आणि विजापूर नाका पोलिस ठाण्यात अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

रावसाहेब बाबूराव मोकाशे (वय ६८, रा. पुणे) यांचे हैदराबाद रोड येथील मंत्री चंडक आंगनमध्ये घर आहे. ते बंद असल्याची संधी साधत अज्ञात चाेराने १८ रोजी रात्री कुलूप तोडून घरातील गॅस टाक्या, घरगुती साहित्य असे ३७५० रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत रावसाहेब मोकाशे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

 

दुसरी घटना विजापूर रोड, अमर नगर येथे घडली. प्रकाश गणपती राजकोश (वय २५) यांच्याकडील ११०० रुपयांचे फायबर बॉडीची इलेक्ट्रिक मोटार अज्ञात चोराने चोरून नेली. ही घटना १० ते ११ जानेवारी दरम्यान घडली. याबाबत प्रकाश राजकोश यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

 

बातम्या आणखी आहेत...