आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माढ्यातील हमीभाव खरेदी केंद्रे पडली बंद, शेतकऱ्यांना फटका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुर्डुवाडी - माढा तालुक्यामध्ये उडीद, मूग व मका हमीभाव खरेदी केंद्र सुरू झाले होते. मात्र अचानक मका हमीभाव खरेदी केंद्र बंद झाले तर तूर खरेदी अद्याप सुरू नाही. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. या प्रश्नाकडे कोणत्याही राजकीय पक्ष व शेतकरी संघटनांचे दुर्लक्ष होत आहे. फेडरेशनचे अधिकारी आदेशच्या प्रतीक्षेत आहेत.

 

तालुक्यातील बाजार समितीमध्ये उडीद खरेदी सुरू करण्यात आली होती. नोव्हेंबरमध्ये बंद झाले. यानंतर मका खरेदी सुरू करण्यात आले. या वेळी गोदाम नसल्यामुळे पाच दिवस खरेदी बंद होती आणि ऑनलाइन नोंदवलेल्या शेतकरी मात्र बाजार समितीच्या एसएमएसच्या प्रतीक्षेत असताना ३१ डिसेंबर रोजी मका खरेदी केंद्र बंद करण्यात आले. तसेच ४ जानेवारीपासून तुर हमीभाव खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली. मात्र अद्याप तूर खरेदी सुरू झालीच नाही. शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी किंवा सरकारला जाब विचारण्यासाठी सर्वच शेतकरी संघटनांनी दुर्लक्ष केले आहे. मका, तूर घरामध्येच पडून राहिल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

 

मका व तूर हमीभाव खरेदी केंद्र सुरू होण्यासाठी फेडरेशनचे अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले आहे. दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांची नोंद असलेल्या मका खरेदी करण्याचे आश्वासन मिळाले आहे. तूर खरेदी सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय पाटील घाटणेकर यांनी सांगिले. स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी पाटील म्हणाले, खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे. सोमवारी संघटनेचे पदाधिकारी समक्ष भेटून हमीभाव केंद्र सुरू करण्यासाठी भाग पाडणार आहे.

बातम्या आणखी आहेत...