आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहकारमंत्र्यांचे आरक्षित जागेवर बांधकाम, कोर्टात पालिकेविरुद्ध अवमान याचिका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- होटगी रोडवरील अग्निशामक दलाच्या आरक्षित जागेवर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी घर बांधले. त्याविषयी महेश चव्हाण यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. याप्रकरणी १० आॅगस्ट २०१६ रोजी न्यायमूर्ती केमकर यांनी तीन महिन्यात निर्णय द्या, असा महापालिकेला आदेश दिला. त्यावर महापालिकेने उत्तर दिले नाही. याप्रकरणी अण्णाराव भोपळेसह तिघांनी उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली असून १६ मार्चला न्यायमूर्ती अभय ओक यांच्यासमोर सुनावणी आहे. याबाबत महापालिका आयुक्तांना याचिकाकर्त्यांचे वकील चैतन्य निकते यांनी पत्र पाठवून विचारणा केली. 


होटगी रोडवर सहकारमंत्री देशमुख यांचे निवासस्थान आहे. त्याच्या बांधकाम प्रकरणी चव्हाण यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी होऊन २२ नोव्हेंबर २०१६ पर्यंत निर्णय घ्या, असे न्यायालयाने सांगितले. त्यावर महापालिकेने उत्तर दिले नाही. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी न्यायालयाचा अवमान केला म्हणून अण्णाराव भोपळे, नितीन भोपळे, शावरप्पा वाघमारे यांनी ११ सप्टेंबर २०१७ रोजी अवमान याचिका दाखल केली. त्यावर अभय ओक व पी. एन. देशमुख यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. २८ फेब्रुवारीला सुनावणी होती. मुदत मागितल्याने १६ मार्च रोजी फेरसुनावणी होईल. भोपळे यांचे वकील निकते यांनी महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून याबाबत कळवले आहे. 

बातम्या आणखी आहेत...