आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिंचोळीत वीज कोसळून शेतकरी ठार; आंदेवाडी, भोसग्यात बैल दगावले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अक्कलकोट - अक्कलकोट शहर व तालुक्यात रविवारी दुपारनंतर अवकाळी पावसाने मेघगर्जनेसह जोराची हजेरी लावली. चिंचोळी (न) भागात साडेपाचच्या सुमारास वीज पडून शेतात काम करणारा एक ५५ वर्षीय शेतकरी ठार झाला. अलाउद्दीन दस्तगीर बेनुरे असे त्याचे नाव आहे. तसेच आंदेवाडी (ज) येथे हणमंत गुरप्पा बिराजदार यांचा तर भोसगा येथे शरणप्पा शिवराम सुतार यांचा बैल ठार झाला. 


रविवारी दुपारी ४ नंतर विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. अक्कलकोट शहरात पावसाचा व हवेचा इतका जोर होता की, ठिकठिकाणी झाडे पडली. पावसाने रस्त्यावर व कडेला पाणी साठले. मैंदर्गी, वागदरी, करजगी, अक्कलकोट शहर आदी भागात जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी गाराही पडल्या. ठिकठिकाणी पत्रे उडाले. सर्व नुकसानीची माहिती घेण्यात येत असल्याची माहिती नायब तहसीलदार सुनील जाधव यांनी दिली. 

बातम्या आणखी आहेत...