आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संक्रांतीनिमित्त सांगलीत सद‌्भावना रॅलीद्वारे सामाजिक एकतेचा ‘गाेडवा’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली- मकर संक्रांतीचे अाैचित्य साधून रविवारी सांगलीत सामाजिक समतेचा संदेश देणारी सद‌्भावना एकता रॅली काढण्यात अाली. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजय पाटील, खासदार अमर साबळे यांच्यासह सर्व स्थानिक लाेकप्रतिनिधींची प्रमुख उपस्थिती हाेती.   


सर्वसामान्य नागरिकांसह मान्यवरांनी या वेळी जातीय सलाेखा, सामाजिक एेक्य कायम राखण्याची शपथ घेतली. सकाळी दहा वाजता पुष्कराज चौकातून सुरू झालेल्या या तीन किलाेमीटर रॅलीचा  शिवाजी स्टेडियममध्ये समाराेप झाला. सामाजिक एकतेचा संदेश देत विविध वेशभूषेतील विद्यार्थी, पोलिस बँड, शालेय विद्यार्थी, महिला व सामान्य नागरिकही या रॅलीत शिस्तबद्धपणे सहभागी झाले हाेते.  सर्वांनी स्तब्ध उभे राहून शहिदांप्रती आदरांजली व्यक्त केली. त्यानंतर रंगीबेरंगी फुगे हवेत सोडण्यात आले. राष्ट्रगीताने रॅलीची सांगता झाली.    


चक्कर येऊन मुलीचा मृत्यू  
रॅली संपवून घरी जाताना रस्त्यात चक्कर येऊन ऐश्वर्या शशिकांत कांबळे नामक १४ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. ऐश्वर्या शिक्षकांसाेबत घरी निघाली होती.  तातडीने रुग्णालयात नेण्यात अाले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.  तिला दोन दिवसांपासून ताप व उलट्यांचा त्रास सुरू होता. अाजारपणामुळे वडिलांनी तिला रॅलीला जाण्यास मज्जाव केला होता तरीही ती  सहभागी झाली, असे सांगण्यात अाले. दरम्यान, मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीनंतर तिच्या मृत्यूचे कारण समजू शकेल, असे जिल्हाधिकारी विजय काळम- पाटील म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...