आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थायी समिती सभापती निवड प्रक्रियेला हायकोर्टाची स्थगिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- महापालिका स्थायी समिती सभापती निवडीसाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या प्रक्रियेस उच्च न्यायालयाने १९ मार्चपर्यंत स्थगिती दिली आहे. स्थायी समिती सभापतिपदासाठी अर्ज दाखल करताना झालेल्या गोंधळामुळे १ मार्च रोजीची प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. त्याविरोधात शिवसेनेचे गणेश वानकर यांनी याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती आर. आय. चागला यांनी हा निर्णय दिला. हा निकाल भाजपसाठी धक्कादायक असून, शिवसेनेच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. 


स्थायी समिती सभापतिपदासाठी १ मार्च रोजी भाजपच्या राजश्री कणके आणि सुभाष शेजवाल हे अर्ज दाखल करताना पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे गोंधळ झाला होता. शेजवाल यांचा अर्ज भाजपच्याच कार्यकर्त्यांनी पळवला. त्यामुळे त्यांचा अर्ज दाखल होऊ शकला नाही. कणके यांच्या अर्जावर अनुमोदकाची सही नव्हती. शिवसेनेकडून गणेश वानकर यांनी अर्ज दाखल केला होता. या गोंधळामुळे निवडणूक प्रक्रिया पुन्हा घेण्याची मागणी भाजपतर्फे करण्यात आली होती. विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी पुन्हा निवडणूक घ्या, असा आदेश २ मार्च रोजी दिली. त्यानंतर लागलीच ३ मार्च रोजी त्यांनी नवा आदेश काढून प्रक्रियेला स्थगिती दिली. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. १ मार्च रोजीची प्रक्रिया रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात वानकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानुसार त्या निर्णयाला उच्च न्यायालयाने १९ मार्चपर्यंत स्थगिती दिली आहे. त्यामु‌ळे नव्याने मंगळवारी (दि. ६) सुरू झालेली प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयात १९ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...