आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रमिकांची 30 हजार घरे, प्रशासन देणार तत्पर सेवा; जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची ग्वाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - श्रमिकांना हक्काचे घर देण्यासाठी जिल्हा प्रशासन सदैव तत्पर राहील. बांधकामासाठी लागणारे विविध परवाने, रस्ते, वीज आणि पाणी यासाठी एक खिडकी योजना राबवू, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेेंद्र भाेसले म्हणाले.

 

'सर्वांसाठी घरे' या केंद्राच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातून कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथे असंघटित कामगारांसाठी ३० हजार घरांचा प्रकल्प हाती घेण्यात आला. प्रजासत्ताक दिनाचे आैचित्य साधून त्याचे भूमिपूजन झाले. त्या वेळी डॉ. भोसले बोलत होते. प्रकल्पाबाबत सकारात्मक आणि योग्य माहिती शासनाकडे पाठवून देऊ. जेणेकरून कामाला गती येईल. नियोजित वेळेत काम पूर्ण होईल. हे श्रमिकांचे घर आहे. त्यांच्या पाठीशी उभे राहणे माझे कर्तव्यच आहे. लढवय्या नरसय्या आडम यांच्यासारख्या खंबीर नेतृत्वाखाली हा प्रकल्प पूर्णत्वास जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

 

मास्तर स्मार्ट दिसताहेत
कोणत्याही चांगल्या कामांना जास्तीत जास्त विघ्ने येतच असतात. अशा संकटांवर चालून गेल्याशिवाय यश मिळत नाही. या प्रकल्पासाठी अनेक अडचणी आल्या. पण गरिबांना घर देण्याचा चंगच बांधलेले आडम मास्तर गप्प बसले नाहीत. आज श्रमिकांच्या घर उभारणीचा प्रसंग असताना ते खूप स्मार्ट दिसत आहेत.
- महादेव तांबडे, पोलिस आयुक्त

 

संघर्षातूनच मिळाले यश
गेली आठ वर्षे श्रमिकांच्या घरांसाठी लढतोय. मोर्चा, धरणे, रस्त्यावर ठिय्या, जेलभरो अशा अनेक मार्गांनी शासनाकडे लक्ष वेधले. डिसेंबर २०१८ अखेर १० हजार घरकुलांचे बांधकाम पूर्ण होईल.
- नरसय्या आडम, प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक

बातम्या आणखी आहेत...