आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

28 वर्षांनंतर प्रथमच रेल्वे डब्यांचे रंग बदलणार; दिल्ली एक्स्प्रेसला जोडले नवे डबे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर -  भारतीय रेल्वेची ओळख असलेली निळे रंगाचे डबे आता लवकरच इतिहास जमा होणार आहे. कारण रेल्वे डब्यांचे मेकओव्हर करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मेल एक्स्प्रेस व सुपरफास्ट दर्जाचे अायसीएफ डब्यांचा रंग बदलून त्या ठिकाणी विटकरी  व भुरकट रंगाचे असणार आहे.


 शिवाय त्यावर आकर्षक स्टिकर्सदेखील असणार आहे. यासाठी नव्या डब्यांची निर्मिती न करता जुन्याच डब्यांना रंगरंगोटी करून आकर्षक केले जाणार आहे. देशभरातील सुमारे ३० हजार डब्यांचे मेकओव्हर होणार आहे. याची सुरुवात उत्तर रेल्वेतील पठाण कोट - दिल्ली एक्स्प्रेसने झाली आहे.    


ज्या डब्यांचा रंग बदलण्यात येणार आहे त्यात जुने आयसीएफ कोचचा समावेश आहे. शताब्दी, राजधानी, दुरांतो व प्रीमियमसारख्या रेल्वेच्या डब्यांचा यात समावेश असणार नाही. अर्थात एलएचबी दर्जाच्या डब्यांचा रंग आहे तोच राहणार आहे.  गेल्या अनेक दिवसांपासून डब्यांच्या रंगात बदल करावा, अशी मागणी होत होती. रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी मंजुरी दिल्यानंतर याचे काम सुरू झाले आहे. सध्या असलेला निळा रंग १९९० साली देण्याचे ठरवले होते. त्यानुसार गेल्या २८ वर्षांपासून असलेला निळा रंग आता इतिहास जमा होणार आहे. देशात जवळपास मेल एक्स्प्रेस व सुपरफास्टचे जनरल व शयनयान व वातानुकूलित ३० हजार डबे आहेत. हे डबे प्रत्येक झाेनच्या वर्कशॉप येथे पाठवल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना नवा रंग दिला जाणार आहे.
  प्रवाशांना रेल्वे प्रवास करताना वेगळा अनुभव यावा या हेतूने डब्यांचा रंग बदलला जाणार आहे.  ही प्रक्रिया विभाग स्तरावर केली जाणार आहे. यासाठी रेल्वे बोर्डानी मात्र रंगाची निवड केली असून त्यानुसार रंग देणे अनिवार्य केले जाणार आहे. अद्याप मध्य रेल्वेतील एकाही डब्याला अशा पद्धतीचे रंग देण्यात आलेले नाही.    

बातम्या आणखी आहेत...