आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्षीप्रेमींना खुणावतेय केगावचे पोलिस केंद्र; प्राण्यांचा नियमित वावर, खास पाणथळे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- केगाव येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात विविध पक्षी, प्राणी यांचा मुक्त वावर दिसून येतो. कुठल्या परिसरात कुठला प्राणी, पक्षी येतो, त्याची वैशिष्ट्ये, नाव याची माहिती देणारे फलक लावण्यात अाले अाहेत. प्रशिक्षणार्थी पोलिस, अभ्यासक यांना पक्षी, प्राण्यांची माहिती व्हावी हा उद्देश अाहे. 


३५० एकरात प्रशिक्षण परिसर अाहे. त्यातील दीडशे एकरहून अधिक परिसरात दोन पाणथळे अाहेत. दाट झाडी, शेती अाहे. यामुळे परिसरात पक्षी, प्राणी यांचा मुक्त वावर अाहे. हरीण, काळवीट, ससे, चितर, मोर, कोकीळ, चिमणी, बगळे, गरूड, घुबड असे बहुविध पक्षी व प्राणी नजरेस पडतात. कुठल्या भागात ते राहतात त्या जागी फलकाद्वारे माहिती देण्यात अाली अाहे. सुमारे साठ फलक तयार केले अाहेत. प्रशिक्षण केंद्राच्या प्रवेशद्वारापासून दीड - दोन किलोमीटर अंतरावर दोन्ही बाजूला एलईडी दिवे लावलेत. अात प्राण्यांची माहिती देणारे फलक लावल्यामुळे परिसराचे सौंदर्य वाढले अाहे. 


माहिती होण्यासाठी हा उपक्रम 
पक्षी, प्राण्यांची माहिती प्रशिक्षणार्थी पोलिसांना व्हावी. काही नागरिक या भागात कार्यालयीन कामासाठी अाल्यानंतर त्यांनाही माहिती होण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेतला अाहे. मुख्य म्हणजे महिला अौैद्योगिक प्रशिक्षण केंद्र (डफरीन चौक) येथील विद्याथिनींनी हे फलक रंगवून दिले अाहेत. निसर्गरम्य परिसर, दाट झाडी, फुल झाडी, पक्षी, प्राणी यांचा वावर यामुळे हा परिसर अाल्हादायक अाहे. पक्षी, प्राणी यांची माहिती घेण्यासाठी अभ्यासक, विद्यार्थी हेही अामच्या कार्यालयाची पूर्वपरवानगी घेऊन हा परिसर पाहू शकतील, अशी माहिती केंद्राच्या प्राचार्य कविता नेरकर यांनी दिली. 

बातम्या आणखी आहेत...