आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहंभावामुळेच औटी, झावरे पक्षापेक्षा स्वत:ला मोठे मानायला लागले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळकी- पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील जनतेने आमदार विजय औटी आणि सुजित झावरे यांना भरभरून प्रेम दिले. पण आमदार औटी अनेक ठिकाणी पक्षापेक्षा मला मानणारा मोठा वर्ग आहे, अशी भाषा करतात, तर सुजित झावरे स्वत:च्या मर्जीप्रमाणे पक्ष चालवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळेच पारनेर शिवसेना आणि राष्ट्रवादीत अंतर्गत असंतोष धुमसत आहे. आमदार औटी आणि झावरेंना अहंभाव झाला आहे, ते दोघेही स्वत:ला पक्षापेक्षा मोठे मानायला लागले आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे यांनी केली. 


लामखडे म्हणाले, पारनेर मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादीला मानणारा मोठा वर्ग आहे. आमदार औटी हे विकासाच्या गप्पा मारतात. विकासासाठी शासन आमदार निधी देतच असते त्यातून तो कर्तव्याचा भाग म्हणून करायचाच असतो. पण या शिवायही जनतेच्या सुख-दु:खाला धावून जाणे ही प्रत्येक लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे. हे मात्र आमदार औटी सोयीस्कर विसरतात. मतदारसंघ विभाजनानंतरच्या पहिल्या निवडणुकीत आमदार औटी नगर तालुक्यातील जनतेच्या मताधिक्यावर निवडून आले. पण ते नगर तालुक्यासाठी मंगळवार ते मंगळवार ओपीडी करतात. त्यांना कामे सांगायला गेले, तर लोकांवरच ओरडतात. त्यामुळेच पहिल्या वेळी नगर भागातून आमदार औटींना िजतकी मते मिळाली, त्यात दुसऱ्या वेळी मोठी घट झाली आणि आता येणाऱ्या निवडणुकीत या भागात औटींना अजून त्याचा फटका बसेल. सुजित झावरे स्वत:च्या मर्जीप्रमाणे पक्ष चालवतात. पक्षात आपल्यापेक्षा कोणी वरचढ होणार नाही यासाठी ते वेगवेगळया खेळया खेळतात. आमदार औटी आणि सुजित झावरे हे अंतर्गत समन्वयाने आपल्यापेक्षा कोणीही मोठा होणार नाही याची योग्य ती काळजी घेतात. पक्षही न वाढता स्वत: कसे वाढले जाऊ यासाठी दोघेही प्रयत्न करतात. आमदार औटी तर अनेक वेळा शिवसेनेपेक्षा मला मानणारा मोठा वर्ग आहे हे जाहीरपणे बोलतात. तशीच स्थिती झावरे यांचीही आहे. पारनेर तालुक्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन्ही पक्षांत अंतर्गत असंतोष धुमसत आहे. सर्वांना बरोबर घेऊन चालणाऱ्या नेतृत्वाची गरज असल्याचेही लामखडे यावेळी म्हणाले. 

 
शहिदांना वंदन करण्यासाठी तरी या... 
आमदार औटी कधीही कोणाच्या सुख-दु:खाला येत नाहीत. पण पारनेर-नगर या दुष्काळी भागातील अनेक तरुण लष्करात आहेत. त्यातील काही देशाचे रक्षण करताना ते कामी आले आहेत. या शहिदांच्या कार्याची दखल घेत तरी त्यांना अखेरचे वंदन करण्यासाठी, तरी लोकप्रतिनिधीने आले पािहजे ही नैतिकता आहे. ती तरी आमदार औटी यांनी जपावी, असेही लामखडे म्हणाले. 


सेनापती बापट पतसंस्था अडचणीत 
संपदा पतसंस्था बुडाली आणि अनेक कष्टकरी जनतेची स्वप्नेही बुडाली. तीच अवस्था आता आमदार औटींच्या सेनापती बापट पतसंस्थेची होणार आहे. सेनापती बापट पतसंस्था नगरमधील एका महिला पतसंस्थेला विकली होती. पण बापट पतसंस्थेतील घोटाळे लक्षात येताच नगरच्या पतसंस्थेने सेनापती बापट सहा महिन्यांत परत दिली. हे खरे की खोटे हे औटींनी सांगावे, असे आव्हानही लामखडे यांनी दिले. 

बातम्या आणखी आहेत...