आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरटीई प्रवेश; नोंदणी न केल्‍यास इंग्रजी शाळांची मान्‍यता रद्द

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - अार्थिक व दुर्बल घटकातील पाल्यांसाठी शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. परंतु स्वयंअर्थसहाय्यित व खासगी कायम विनाअनुदानित इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी नोंदणी करण्यावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे मागील वर्षाप्रमाणे यंदाही आरटीई प्रवेश प्रक्रियेस विलंब होणार आहे. परंतु वेळेत शाळा नोंदणी न करणाऱ्यांवर मान्यता रद्द करण्याची कारवाई केली जाणार अाहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी संजय राठोड यांनी दिली.

 

नोंदणीसाठी २४ जानेवारीपर्यंत मुदत वाढ दिली आहे. नोंदणीस विलंब झाल्याने इतर प्रक्रियेसही विलंब होणार आहे. तरीदेखील नोंदणीवर मुख्याध्यापक व संस्था चालकांचा बहिष्कार कायम आहे.

 

अारटीईअंतर्गत प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांच्या शुल्काची प्रती पूर्ती शासनाकडून देण्यात येते. परंतु तीन ते चार वर्षापासून शाळांना पैसे मिळाले नाहीत, तरी लवकरात लवकर द्यावेत, त्याबाबत हमी मिळावी. त्यानुसार नोंदणी करण्यास सुरुवात होईल.

- गणेश नीळ, मेस्टा संघटना

बातम्या आणखी आहेत...