आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भक्तांनी हिमतीने अडीच तासात नागफणा सजवल्यानंतर नंदीध्वज झाले मार्गस्थ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - माणिक चौक ते विजापूरवेस दरम्यानच्या कालिका मंदिराजवळील व्यत्ययानंतरही सिध्देश्वर भक्तांनी केलेल्या धडपडीनंतर अडीच तासात नव्याने सजवलेल्या नागफणा नंदीध्वजाची मिरवणूक मार्गस्थ झाली. २५ किलो वजनाचे साहित्य घेऊन एक किलोमीटर चालणे जिकिरीचे होते. मात्र, श्री सिद्धरामेश्वर यांचा जयघोष करत १५० किलो वजनाचा नंदीध्वज घेऊन दोन किलोमीटरचे अंतर एकट्या सोमनाथ मेंगाणे यांनी रविवारी पार केले. नागफणीचा नंदीध्वज सोडता इतर नंदीध्वज धरून नेण्यासाठी प्रत्येकी दीडशे सेवेकरी लागले.

 

ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेत सात नंदीध्वजांची मिरवणूक काढली जात अाहे. रविवारी सायंकाळी नागफणी बांधलेल्या नंदीध्वजाची मिरवणूक भक्तिमय वातावरणात निघाली. हिरेहब्बू वाड्यापासून निघालेल्या या नंदीध्वज मिरवणुकीत सोन्या मारुती येथील पसारे बंगला येथे नागफणा बांधला गेला. येथून माणिक चौक, विजापूर वेस, सिध्देश्वर पंच कट्टा, सिध्देश्वर प्रशाला, होम मैदान येथे पोहोचली.

 

२१ किमीच्या परिक्षेत्रात ६८ लिंग स्थापिले असून हे न थांबता पायी चालत पूर्ण करण्यासाठी किमान पाच ते सहा तासांचा अवधी लागतो. मात्र रविवारच्या दुर्घटनेने त्याला नऊ तास लागले. रविवारी होमविधीसाठी निघालेल्या नंदीध्वज मिरवणुकीत बाराबंदी घातलेले सुमारे ८ हजार भाविक अनवाणी पायाने चालत निघाले होते.


मध्यरात्री १.३० वाजता नंदीध्वज होम मैदानावर
माणिक चौकातून मिरवणूक पुढे निघाल्यानंतर नऊ वाजेच्या सुमारास कालिका मंदिराजवळ विद्युत डीपीला स्पर्श झाला. नंदीध्वजाला लावलेल्या साहित्यास शाॅर्टसर्किटने नंदीध्वजाच्या वरच्या भागाला धग लागली होती. लागलीच नंदीध्वज खाली घेऊन तो बदलण्यात अाला. नवीन नंदीध्वज अाणून त्याला लगेच नागफणा तयार करून बांधण्यात अाला. यासाठी सर्व सिध्देश्वर भक्तांनी गतीने धडपड करीत अडीच तासात नागफणा नंदीध्वज पुन्हा सजवला. अतिशय शांततेमध्ये कोणतीही गडबड न होऊ देता हा बदल घडवला. त्यानंतर शिव बोला हर्रर्रच्या जयघोषात व त्याच उत्साहात मिरवणूक होम मैदानाकडे मार्गस्थ झाली. होम प्रदीपनासाठी सर्व काठ्या रात्री पावणेबाराच्या सुमारास मार्गस्थ झाल्या. पोलिस, विद्युत मंडळ, अग्निशमन दलाने तातडीने हालचाली करून परिस्थिती हाताळली. मध्यरात्री दीड वाजता नंदीध्वज होम मैदानावर पोहोचले.

 

नागफणा नंदीध्वजासाठी मानकऱ्याची तयारी
सोमनाथ मेंगाणे जून महिन्यापासून बाळीवेस येथील सिद्धेश्वर तालीममध्ये सकाळी दीड तास ते तालीम करतात. दिवाळीनंतर सकाळ आणि सायंकाळ अशा दोन्ही वेळा तालीम सुरू होते. जून महिन्यापासून त्यांचे खानपान सुद्धा बदलते. दरराेज हुग्गी, सुखा मेव्याची खीर, दूध आदी पौष्टिक पदार्थ असतात. तब्बल सहा महिन्यात ते कधीच तेलकट व तिखट पदार्थ खात नाहीत. खूपच इच्छा झाली तर एक वेळचे वेगळे जेवण ते करतात. दीड महिन्यापासून सराव सुरू केला होता.

 

बातम्या आणखी आहेत...