आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

३ युवकांचा गुदमरून मृत्यू; पेट्राेलपंप चालक निर्दोष

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साेलापूर- पेट्रोल पंपावरील सेफ्टीटँक साफ करण्यासाठी आवश्यक ती सामग्री न दिल्याने तीन युवकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आराेपातून पेट्रोल पंप चालकाची निर्दोष मुक्तता झाली. न्यायदंडाधिकारी ए. आर. शेंडगे यांनी हा आदेश पारित केला. 


शशिकांत हणमण्णा हत्तीबेनगल, (वय ४०, रा. मोदी)यांचा टाकळी येथे स्टार पेट्रोल पंप आहे. तेथे अजय विजय जाधव हा सात वर्षापासून नोकरीस होता. १२ मे २०१६ रोजी नेहमीप्रमाणे अजय हा सकाळी नऊ वाजता पंपावर कामास आला. त्यावेळी मालकाने आपणास सेफ्टीटँक साफ करण्यास सांगितले, अशी माहिती अजयने फोन करून आपल्या भावास दिली होती. सेप्टी टँक साफ करण्यासाठी अजयने गल्लीतील कैलास कोष्टी यास समवेत घेतले. सेफ्टीटँक साफ करीत असताना त्यातील विषारी वायुमुळे ते गुदमरून मृत्यू पावले. 


अन्य कामगार राजशेखर कोरे हा घटनेवेळी त्या दोघांना वाचविण्याचा प्रयत्न करीत असताना त्याचाही गुदमरून मृत्यू झाला. सेफ्टी टँक साफ करण्यासाठी आवश्यक ती सामग्री न दिल्याने तिघांच्या मृत्यूस पंपचालक कारणीभूत असल्याची फिर्याद अजयचा भाऊ सुभाष विजय जाधव यांनी मंद्रूप पोलिसांत दिली. या खटल्याची सुनावणी न्यायदंडाधिकारी ए. आर. शेंडगे यांच्यासमोर झाली. या खटल्यात फिर्यादी, डॉक्टर तसेच तपास अधिकाऱ्यासह १३ जणांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. पंपचालक हत्तीबेनगल यांच्यातर्फे अॅड. प्रशांत नवगिरे यांनी युक्तिवाद केला. मृत अजय जाधव व राजशेखर कोरे हे पंप चालकाकडे नोकरीस होते ही बाब पुराव्यानिशी शाबित झाली नाही. तसेच वैद्यकीय अहवालानुसार तिघांचा मृत्यू वेगवेगळ्या कारणाने झाल्याचे दिसून येतेे, असा युक्तिवाद केला. 

बातम्या आणखी आहेत...