आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षांचा निकाल लागण्यास होतोय उशीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सलग दोन वर्षे वेळेत निकाल देण्यासाठी कौतुक झालेल्या सोलापूर विद्यापीठाची यंदा पीछेहाट होत आहे. विज्ञान पदवीसह अन्य अभ्यासक्रमांचे निकाल मुदतीपेक्षा उशिरा लागले आहेत. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डाॅ. बी. पी. पाटील यांच्याकडे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा निकालाचे काम देण्यात आले आहे. त्याचा थेट परिणाम सोलापूर विद्यापीठ परीक्षा विभागावरही पडत आहे. तरीही वेळापत्रकानुसारच काम सुरू असल्याचा विद्यापीठाचा दावा आहे.

 
उत्तरपत्रिकांची झेरॉक्स ऐवजी ऑनलाइन उत्तरपत्रिकाच मेलद्वारे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मशिन अजून सुरू होणे बाकी आहे. दरम्यान झेरॉक्स प्रत देणेही लांबवण्यात आल्याने यात महत्त्वाचे दिवस वाया जात आहेत. बीएस्सीचा निकाल वेळेत न लागल्याने परीक्षा अर्ज स्वीकारण्याच्या तारखाही बदलाव्या लागल्या. अंतर्गत मूल्यमापनाचे गुण महाविद्यालय स्तरावरील नोटीस बोर्डावर लावण्याच्या सूचनाही विद्यापीठाने दिल्या आहेत. यातही तांत्रिक त्रुटी आहेत. यावर विद्यापीठाने सर्व आलबेल असल्याचे सांगितले असले तरी परीक्षा विभाग अनेक अडचणींचा सामना करीत आहे. 


वेळापत्रकानुसार काम सुरू आहे 
मागील सत्र परीक्षांचे निकाल लावल्यानंतर पुढील सत्र परीक्षांचे अर्ज स्वीकारण्याच्या तारखा घोषित होतात. वेळापत्रकानुसार हे कार्य सुरू आहे. परीक्षा विभाग कार्यतत्पर आहे. विद्यार्थ्यांना अडचण येणार नाही, त्यास सर्वप्रथम प्राधान्य असते.
- डॉ. गणेश मंझा, कुलसचिव, सोलापूर विद्यापीठ 

बातम्या आणखी आहेत...