आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात कचऱ्याचे संकलन, डेपोपर्यंत पोहोचविण्याची समस्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापुरातील कचरा टाकण्यासाठी तुळजापूर रस्त्यावरील भोगाव येथे ५५ एकरांवर कचरा डेपो आहे. तेथे बायोएनर्जी प्रकल्प सुरू असून, तो देशातील पहिलाच आहे. डंपिंग ग्राऊंड आहे. मात्र गरज आहे शहरातील कचरा संकलित करून डेपोपर्यंत पोहोचवण्याची. घंटागाड्या, कचराकुंड्या आणि सफाई कामगारांची कमतरता असल्याने शहरातील काही भागांत दोन ते दिन दिवस कचरा पडून राहतो. 


आैरंगाबाद शहरातील कचरा समस्येमुळे डंपिंग ग्राउंडचा मुद्दा चर्चेत आला. यापुढे सरकार डंपिंग ग्राउंडसाठी जागा देणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. सोलापुरात डंपिंग ग्राउंड आहे, मात्र समस्या आहे कचरा संकलित करण्याची. तुळजापूर रोडवरील भोगाव कचरा डेपो येथे ५५ एकर जागा आहे. शहरात रोज ३०० टन कचरा निर्माण होतो. हा कचरा भोगाव डेपोत टाकला जातो. या कचऱ्यात प्लास्टिक पिशव्यांचे (कॅरीबॅग) प्रमाण मोठे आहे. कचरा विल्हेवाटीसाठी आराखडा तयार करण्यात आला. त्यानुसार नऊ एकरांत बायोएनर्जी प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. मात्र, दुसरीकडे कचरा संकलन करण्यासाठी महापालिकेकडे यंत्रणा नाही. रोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे नियमित संकलन होत नाही. हद्दवाढ भागात कचराकुंड्या (कंटेनर) नसल्याने कचरा विखुरलेला असतो. रोज कचरा उचलणे आवश्यक असताना तो उचलला जात नाही. यासाठी घंटागाड्या, सफाई कर्मचारी, आरसी वाहनांची कमतरता आहे. दोन ते तीन दिवस कचरा तसाच पडून राहतो. 


कर्मचारी संख्या कमी, आयोगाचे मत 
कचरा संकलन करण्यासाठी कर्मचारी आणि घंटागाड्या नाहीत. त्यामुळे संकलन होत नाही. महापालिकेने स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने ९० घंटागाड्यांची मागणी केली. वाहने आणि कर्मचारी नसल्याने शहरात कचरा पडून राहतो, असे मत सफाई आयोगाचे अध्यक्ष रामूजी पवार यांनी व्यक्त केले. 

बातम्या आणखी आहेत...