आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीमंतांच्या लग्नसोहळ्यात वधू पाठवणीच्या प्रसंगी 'बँड-बाजा-बाराती'च्या चोऱ्या!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- श्रीमंत कुटुंबातील लग्नसोहळे हेरायचे. दिवसभर पाळत ठेवायची. महिलांच्या पर्सकडे सारखे लक्ष. कुणाच्या अंगावर जास्त दागिने? ते पर्समध्ये कुठे ठेवले जातात? लग्नानंतर मुलीला सासरी पाठवणीच्या प्रसंगी संधी साधून पर्स अथवा दागिने पळवायचे... अशा अनोख्या पद्धतीने चोरी करणारी टोळी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी जेरबंद केली. मध्य प्रदेशातील बँड, बाजा, बाराती नावाने ही टोळी देशभरात अशा चोऱ्या करण्यासाठी कुप्रसिद्ध अाहे.

 
गीताबाई जितमल सिसोदिया (वय ३७, रा. कडीयासासी, राजगड, मध्य प्रदेश) या संशयित महिलेला अटक झाली अाहे. त्यांच्यासह एक मुलगा व एक मुलीला (दोघे अल्पवयीन) ताब्यात घेऊन सुधारगृहात ठेवण्यात अाले अाहे. 


सुरेखा संजय मेंगजी (रा. मेंगजी हाऊस, वसंतविहार, जुना पुना नाका) यांनी सदर बझार पोलिसात तक्रार दिली अाहे. २० फेब्रुवारीला त्यांच्या मुुलीचा विवाह सोहळा गांधीनगर येथील हेरिटेज मंगल कार्यालयात होता. त्यावेळी त्यांची पर्स चोरीला गेली होती. त्यात हिरेजडीत कर्णफुले, मोबाइल व अन्य साहित्य होते. 


ठळक मुद्दे... 
- नांदेड, पुणे येथे या टोळीतील साथीदारांना अाठ दिवसांपूर्वी पकडले अाहे 
- दोनही मुलांना रेल्वे स्टेशन, धार्मिक स्थळाच्या ठिकाणी थांबवतात 
- ठेकेदाराकडून टीप मिळाली की मुलांना नवीन कपडे घालून तयार करतात 
- चोरलेले दागिने मध्यप्रदेशात नेऊन वितळवले जातात 
- मध्यप्रदेशात या टोळीला खास प्रशिक्षण दिले जाते 


या पथकाने केला तपास 
सहायक पोलिस निरीक्षक माळी, फौजदार मधुरा भास्कर यांच्यासह संतोष येळे, वसीम शेख, मंगरूळे, करण माने, गायकवाड, राजू चव्हाण, शंकर मुळे, नाना उबाळे, शीतल शिवशरण, सचिन बाबर, सागर गुंड, दत्ता कोळेकर, फुलारे, यादव, निंबाळकर. 


नेमकी काय अाहे, 'बँड-बाजा-बाराती' टोळी? 
मध्य प्रदेशातील काही ठरावीक गावे अाहेत. लहान मुलांचा चोरीसाठी वापर केला जातो. अाई- वडिलांना पैसे िदले जातात. काही महिने, सहा अथवा एक वर्ष मुलांना चोरी करण्यासाठी अन्य शहरात पाठवतात. यासाठी एक ठेकेदार नेमला जातो. मुलांना विविध शहरात नेणे, चोरीच्या ठिकाणी नेऊन सोडणे, टेहळणी करणे, उच्च कुटुंबातील लग्न ठिकाण हेरणे हे त्यांचे काम. लग्नसोहळ्यात अंगावर दागिने असलेल्या महिलेवर लक्ष ठेवण्यात येते. मुलीला सासरी पाठवण्याचा सोहळा सुरू झाला की, महिला घाईगडबडीत असतात. त्यावेळी नेमकी संधी साधून दागिने व साहित्य पळवण्यात येते. काम फत्ते झाले की दुसरा सहकारी ठेकेदाराशी संपर्क करतो. बाहेर चारचाकी गाडी तयार असते. चोरी केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत शहर सोडून जातात. २० तारखेला दोन मुले दिवसभर सोलापुरातील हेरिटेजमध्ये होती. 
- वैभव माळी, सहायक पोलिस निरीक्षक 


वरातीत येतात, बिदाईवेळी डाव साधतात 
मुुले चोरी करण्यासाठी वराती पाहुण्यांसोबत कार्यालयात येतात. सुरुवातीला पाहुणे उतरलेल्या खोलीची टेहळणी करतात. शक्यतो मुलीकडच्या नातेवाइकांवर विशेष लक्ष असते. कारण मुलीच्या बिदाईवेळी (पाठवणी) मुलगी, अाई, वडील, नातेवाईक भावुक झालेले असतात. त्यावेळी संधी साधली जाते. सौ. मंेगजी यांचीही पर्स त्या दिवशी अशाच पद्धतीने पळवण्यात अाली. त्या पाहुण्यांच्या भेटीत व्यस्त असताना ही चोरी झाली होती. 

बातम्या आणखी आहेत...