आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुस्तीला प्रोत्साहन : सिद्धेश्वर आखाडा होणार अद्ययावत, कुस्त्यांना मिळणार गतवैभव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- महाराष्ट्राच्या मातीतील खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी सिद्धेश्वर आखाडा अद्ययावत करण्याचे स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाने निश्चित केले आहे. त्यासाठी स्मार्ट सिटीच्या निधीतून दीड कोट रुपये मंजूर केले आहेत. याचा अंतिम प्रस्ताव दिल्ली कार्यालयास पाठविला असून त्यांची मंजुरी मिळताच याचे काम तीन महिन्यात पूर्ण होणार असल्याची माहिती स्मार्ट सिटीचे मुख्य तांत्रिक अधिकारी तपन डंके यांनी 'दिव्य मराठी'ला दिली. 


खो-खो, कबड्डी व योगाही 
कुस्तीबरोबरच या परिसरातील जागेचा उपयोग खो-खो, कबड्डी व योगासाठी करण्यात येणार आहे. खो-खो व कबड्डीचे मैदान तयार करण्यात येईल. त्याबरोबरच योगा करण्यासाठी छोटीशी जागा विकसित करण्यात येईल. सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांसाठी छोटासा अद्ययावत ट्रॅक तयार करण्यात येणार आहे. या ट्रॅकवरून अनवाणी पायाने चालल्यानंतर शरीरातील रक्ताभिसरण क्रिया शुद्ध होण्यास मदत होईल. 

बातम्या आणखी आहेत...