आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • A. B. Urdu Literature Meeting Organizing Committee Award

मझाज, लतिफ, मीर अफझल यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - उर्दूसाहित्य संमेलन समितीच्या वतीने राष्ट्रीयस्तर, राज्यस्तर जिल्हा स्तरावर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तिघांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. अ. भा. उर्दू साहित्य संमेलन समिती सोलापूरच्या वतीने यंदा साहित्यिक मुझतर मझाज (मुंबई), पत्रकार शाहिद लतिफ (मुंबई) कवी मीर अफझल (सोलापूर) यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष अॅड. यू. एन. बेरिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पुरस्काराचे वितरण माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते सोमवार २९ रोजी सायंकाळी ६.३० वाजता लष्कर येथील बेरिया शैक्षणिक सभागृहात होणार आहे. यावेळी महापौर सुशीला आबुटे, कुलगुरू एन. एन. मालदार, कवी एजाज नबी कारिगर यांची उपस्थिती राहणार आहे. राष्ट्रीय पुरस्कारासाठी ५१ हजार, राज्यस्तरीय २५ हजार तर जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी ११ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल श्रीफळ असे स्वरूप असणार आहे. यावेळी उर्दू नाट्य संमेलनात दैनिक, चॅनल्सने सहकार्य केल्याने त्यांच्या प्रतिनिधींचा गौरव करण्यात येणार आहे.

साहित्यिक मुझतर मझाज यांनी जामिया उस्मानिया विद्यापीठातून पदवी संपादन केली आहे. कवी इक्बाल गालिब यांच्या रचनेवर त्यांनी संशोधन केले त्याचा उर्दू भाषेत अनुवाद केला. शिवाय अमेरिका, इंग्लड आदी देशांतील कवी संमेलनात त्यांनी कविता सादर केल्या आहेत. पत्रकार शाहिद लतिफ गेल्या २० वर्षांपासून दैनिक इन्कलाब या उर्दू दैनिकात संपादक म्हणून काम करत आहेत. त्यांनी शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील विषयांवर लेखणीतून विचार मांडले आहेत. सोलापूरचे कवी मीर अफजल ११९८ मध्ये उर्दू मेलाचे प्रमुख आयोजक होते. त्यांनी इस्लाही फलाही तन्जीम या संस्थेच्या माध्यमातून उल्लेखनीय काम केल्याने त्यांना जिल्हा स्तरावरील जीवन गौरव पुरस्कराने सन्मानित करण्यात येणार आहे. या पत्रपरिषदेला कॅप्टन शफी शेख, बशीर परवाझ, अखलाक शेख उपस्थित होते.