आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र-कर्नाटक पाण्याचा वाद संपवण्यासाठी संयुक्त बैठक, कर्नाटकच्‍या जलसंपदामंत्र्यांची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- कृष्णा नदीचे पाणी महाराष्ट्र सरकार कर्नाटकातील दुष्काळी भागात देते, तर कर्नाटकातील पाणी सांगली जिल्ह्यासाठी दिले जाते. असे असतानाही भीमा नदीच्या पाण्यासह अनेक वाद आहेत. ते साेडवण्यासाठी दोन्ही राज्यांतील वरिष्ठांची संयुक्त बैठक होणे अपेक्षित आहे. त्यासाठी प्रक्रिया सुरू असल्याची माहिती कर्नाटकाचे जलसंपदामंत्री एम. बी. पाटील यांनी शनिवारी दिली.   
 
पाटील म्हणाले, सोलापूरसाठी उजनीतून पाणी सोडताना कर्नाटकात अडवले जाते. कृष्णा नदीचे पाणी कर्नाटकातील दुष्काळग्रस्त भागात सोडले जाते. कर्नाटकातील पाणी जत तालुक्यात सोडण्यात येते. सोलापूरसाठी  आलमट्टी धरणातून इंडी कॅनॉलद्वारे पाणी सोडण्याचे अंतर २०० किमी आहे आणि तेथून पाणी २०० क्युसेक इतका प्रवाहाने येते. त्यामुळे  ते पाणी सोलापूरसाठी सोडणे कठीण आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील पाण्याचा वाद संपवण्यासाठी दोन्ही राज्यांतील वरिष्ठांची कमिटी गठित करून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न होईल, असेही ते  म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...