आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका स्वीकृत सदस्यपदासाठी काँग्रेसच्या 18 इच्छुकांचे लॉबिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वीकृत सदस्य नियुक्ती नियमात दुरुस्तीचे सूतोवाच केल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांतील कार्यकर्त्यांच्या अाशा पल्लवित झालेल्या अाहेत. महापालिका निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या मतांच्या संख्येत सध्यस्थितीत स्वीकृत सदस्य नियुक्तीची संधी अाहे.
 
 या एका जागेसाठी तब्बल १८ जणांनी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे स्वीकृत सदस्यपदी वर्णी लागावी यासाठी मागणी केलेली अाहे. काँग्रेसची सभागृहातील स्थिती लक्षात घेता अभ्यासू आणि अनुभवी व्यक्तीची गरज आहे. त्यामुळे श्री. शिंदे हे काेणाच्या गळ्यात स्वीकृत पदाची माळ घालतील, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 
महापालिका निवडणुकीनंतर शिंदे हे प्रथमच मंगळवारी सोलापुरात आले होते. सोलापुरात आल्यानंतर त्यांनी दुपारी ११ वाजण्याच्या सुमारास कॉँग्रेस भवन येथे कार्यकर्त्यांच्या गाठीभेठी घेतल्या. 
 
या वेळी चर्चा विनिमय झाल्यानंतर मेघनाथ येमूल, सुदीप चाकोते, हसीब नदाफ, अंबादास गुत्तीकोंडा, सुनील रसाळे, सिद्धेश्वर मुनाळे, राजशेखर हिरेहब्बू, बसवराज म्हेत्रे, मितेश काळे, उपेंद्र ठकार, युवराज जाधव, करीम शेख आदी १८ जणांनी स्वीकृत सदस्यपदासाठी अापण इच्छुक असल्याचा दावा केला. या वेळी काहीनी शक्तिप्रदर्शनही केले. श्री. शिंदे यांच्याकडे लिखितस्वरुपातही काहीनी मागणी केली. शिंदे यांनी निवेदन स्वीकारले आणि बघू असे स्मितहास्य करीत उत्तर दिले. 
 
दिल्लीपासूनच पक्षामध्ये संघटनात्मक बदल हवेत 
राहुल गांधी हेच काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करतील. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षात दिल्ली ते गल्लीपर्यंत सर्वत्र संघटनात्मक बदल हवेत. उत्तर प्रदेशातील निवडणुकीत जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. जनतेच्या या मताचा आम्ही आदरच करत आहोत. जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर सत्तेसाठी आम्ही शिवसेनेसोबत जाणार नाही, जास्तीत जास्त युवकांना संधी द्यावी. असे श्री. शिंदे यांनी सांगितले. 
 
“समजदार को इशारा काफी’ 
माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्यावरून “समजदार को इशारा काफी’ या उक्तीप्रमाणे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांचा राजीनामा मागणाऱ्या टीमने तात्पुरते तरी आपल्या तलवारी म्यान केल्या. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्व संघटनात्मक बदल व्हावे, असे मत व्यक्त केले.
 
 या शब्दावरून “आत्ता शिंदेसाहेब शंभर टक्के बदल करतील, त्यामुळे आम्ही साहेबांची भेट घेतली नाही’, असे मत राजीनामा मागणाऱ्या सदस्यांपैकी एक शरणप्पा दुर्लेकर यांनी व्यक्त केले. मात्र शिंदे यांनी “नेतृत्व बदलाबाबत माझ्याशी थेट बोलावे, आता मागून वार करणाऱ्यांची गय केली जाणार नाही’ हे ठणकावून सांगितले. 
 
याबाबत राजीनाम्याचा बाऊ करून पडद्यामागून राजकीय खेळी खेळणाऱ्यांना शिंदे यांनी दणका दिला आहे. त्यामुळे शिंदे यांच्या नेमक्या कुठल्या शब्दावरून ही टीम शांत आहे, हे समजून येत नाही. 
बातम्या आणखी आहेत...