आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून, पतीला जन्मठेप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून केल्याप्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा मुख्य जिल्हा न्यायाधीश विभा कंकणवाडी यांनी अाज सुनावली. बाळू दादा जाधव (वय ६२, रा. सावळेश्वर, मोहोळ) याला शिक्षा झाली अाहे.

स्वाती बाळू जाधव (वय ३२, रा. सावळेश्वर) या महिलेचा मृत्यू झाला अाहे. राजेश माने (रा. अाढेगाव, मोहोळ) यांनी मोहोळ पोलिसांत फिर्याद दिली होती. २१ सप्टेंबर २०१४ रोजी हा प्रकार घडला होता. अारोपी बाळू याने स्वाती यांच्यासोबत दुसरा विवाह केला होता. त्यांना दोन मुलेही झाली. लग्नानंतर काही दिवसांतच तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन भांडण करू लागला. अनेकदा नातेवाईकांनी समजावून सांगितले. पण, काहीच परिणाम झाला नाही. घटनेदिवशी रात्री स्वाती यांच्या उजव्या कपाळाजवळ हत्याराने वार केल्यामुळे त्या जागीच बेशुद्ध पडल्या. हा प्रकार मुले बापू श्याम या दोघांनी पाहिल्यानंतर घाबरून रात्री तसेच झोपी गेले.

सकाळी घरात वडीलही नव्हते. अाईही उठली नाही. हा प्रकार राजेश माने (मृत महिलेचा भाऊ) यांना कळल्यानंतर घरी येऊन मुलांकडे चाैकशी केली असता त्यांनी पाहिलेला प्रकार सांगितला. पोलिसांत तक्रार दिल्यानंतर तपास सुरू झाला. अकरा साक्षीदार तपासले. मुलगा प्रकाश, वैद्यकीय अधिकारी, तपास अधिकारी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. हा गुन्हा न्यायालयात सिद्ध झाल्यामुळे जन्मठेपेची शिक्षा झाली. सरकारतर्फे अानंद गोरे, अारोपीतर्फे धनंजय माने या वकिलांनी काम पाहिले.

मोबाईल चोरीला
होम मैदानावर गदीॅचा फायदा घेत शशिकांत ब-हाणपूरे (रा. हुच्चेश्वरनगर) यांचा मोबाईल पळविला. शनिवारी हा प्रकार घडला. सदर बझार पोलिसात फियाॅद देण्यात अाली अाहे. बावीस हजार किंमतीचा मोबाईल होता. चोराने गदीॅचा फायदा घेत खिशातील मोबाईल काढून घेतला. हवालदार कांबळे तपास करीत अाहेत.