आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात आलेल्या भाविक महिलेचा चंद्रभागेत बुडून मुत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
पंढरपूर- आषाढी यात्रेसाठी पंढरपुरात आलेल्या बुलढाणा येथील भाविक महिलेचा चंद्रभागेच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज घडली. पंचकुला सावळे असे या महिलेचे नाव असून सकाळी सहा वाजता आघोळीसाठी नदीत गेल्या असतांना त्यांचा बुडून मुत्यू झाला.
 
पंचकुला लक्ष्मण सावळे या बुलढाणा जल्ह्यातील बदनेर भुलाजी येथील रहिवाशी आहेत. आज (गरुवारी) सकाळी ६.४० वाजता दत्तघाटा समोरील चंद्रभागा नदीत अंघोळीसाठी नदीपात्रात गेल्या असताना त्यांचा पाण्यात बुडुन मृत्यू झाला. याबाबत उपजिल्हा रुग्णालयाचे सिस्टर मुजावर यांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली असून पुढील तपास पोलिस ए. डी. कांबळे हे करीत आहेत.
 
हेही वाचा.. 
 
बातम्या आणखी आहेत...