आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माउलींच्या वारीचे सोशल मीडियावरून दर्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळा यंदा फेसबुक आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून जगभरात सगळ्यांनाच अनुभवता येणार आहे. ज्यांना दर्शन घेणे अथवा स्वत: वारीत जाऊन अनुभव घेणे शक्य नाही त्या सगळ्यांना यंदाच्या वर्षीपासून "चला वारीला"दि जर्नी ऑफ वारी या फेसबुक पेजवरून तर व्हाटस् अॅपच्या विशिष्ट नंबरवर रामकृष्णहरी हा मेसेज टाइप केल्याने सुरू असलेल्या वारीची संपूर्ण माहिती जलद गतीने मिळणार आहे.

वेब दुनियेचे जाणकार हे काम करणार आहे. प्रत्यक्ष वारी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून एकत्र आलेल्या या तरुणांनी हा उपक्रम सुरू केला आहे.

जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसून तुम्हाला वारीचे दर्शन होईल. संकल्पना अविनाश सूर्यवंशी व सागर गंधारे यांची आहे. या उपक्रमाच्या नियोजनाचे काम अवी दास, अभिषेक कुंभार, महेश ढाकणे, धनंजय कोकाटे, शिवराज माने, विनायक चिखलगे, अभिषेक घोटेकर, लखन घाडगे,अभिजित मोहिते, धीरज भाकरे, मुकेश तल्ला, प्रशांत चव्हाण, गौरीश सोनार आणि व्हिडिओ एडिटिंग श्रीराम बडवे पाहतात. ज्ञान फाउंडेशन व अनेक संस्थांचे त्यांना सहकार्य आहे.

असा घ्या अनुभव
वारी अनुभवण्यासाठी फेसबुकच्या खालील लिंक वर जाऊन पेज लाइक करा www.facebook.com/chalawarila व्हॉट्सअॅप वारी अनुभवण्यासाठी खालील नंबरवर ‘राम कृष्ण हरी'असा मेसेज व्हॉट्सअॅप करा ९०२८८७७८७७

दर्शन देणे हा हेतू
वारी ही देशातील आकर्षणाचा केंद्र बिंदू आहे. जात पात धर्म पंथ या सर्वांच्या पलीकडे जाऊन तिचे महत्त्व आहे. डिजिटल युगामध्ये घरबसल्या दर्शन घेता यावे आणि दैवताला पाहता, स्मरता यावे आणि एकतेचा सोहळा अखंडपणे पाहता यावा यासाठी हा प्रयत्न करीत आहोत. श्रीराम बडवे, चला वारी टीम सदस्य
बातम्या आणखी आहेत...