आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांच्‍या आंदोलनाला यश, 20 वर्षांपासून रखडलेल्‍या आष्‍टी उपसा जलसिंचन योजनेच्‍या कामाला सुरुवात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उजव्या व डाव्या कालव्याचे अपूर्ण काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन देताना उजनी कालवा विभागाचे अधिक्षक अभियंता रा. ज. कांबळे, उपविभागीय अभियंता ब. व्ही. जीवने व आंदोलनकर्ते आणि प्रभाकर देशमुख. - Divya Marathi
उजव्या व डाव्या कालव्याचे अपूर्ण काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन देताना उजनी कालवा विभागाचे अधिक्षक अभियंता रा. ज. कांबळे, उपविभागीय अभियंता ब. व्ही. जीवने व आंदोलनकर्ते आणि प्रभाकर देशमुख.
सोलापूर (मोहोळ) - अठरा ते वीस वर्षापासून रखडलेल्या आष्टी उपसा जलसिंचन योजनेचे काम मार्गी लागावे, ते पाणी उजव्‍या कालव्‍याच्‍या 20 किमीपर्यंत व डाव्‍या कालव्‍याच्‍या 14 किमी पर्यंत सोडण्‍यात यावे, भूसंपादनाचे पैसे तात्काळ मिळावे या मागण्‍यांसाठी सोलापूरमधील मोहोळ तालुक्यामध्‍ये चाळीस फुट खोल कालव्यात जनहित संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख 300 शेतकऱ्यांसह गेल्या दहा दिवसापासून प्राणांतिक उपोषणास बसले होते. त्यांच्या आंदोलनाला आज बुधवारी अखेर यश मिळाले.
 
प्रशासनाने शेतकऱ्यांच्‍या मागण्‍या मान्‍य करत लवकरच रखडलेली कामे पूर्ण करण्‍यात येईल व कालव्‍यात पाणी सोडण्‍यात येईल, असे आश्‍वासन शेतकऱ्यांना दिले. त्‍यामुळे जनहित संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख आणि शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले आहे.
 
रखडलेल्‍या कामाला सुरुवातही झाली
डाव्या व उजव्या कालव्यासाठी संपादित झालेल्या जमिनीचा मोबदला म्हणून ६.५० कोटी रुपयांची रक्कम १५ दिवसांमध्ये शेतकऱ्यांना वितरित करण्‍यात येणार, उजवा कालव्‍यात २० किमीपर्यंत व डावा कालव्‍यात १४ किमी पर्यन्त पाणी नेण्यासाठीची कामे १० मे पर्यन्त पूर्ण करणार, आष्टी तलावात ०.१० टीएमसी पाणी सोडणार, असे लेखी आश्वासन उजनी कालवा विभागचे अधिक्षक अभियंता रा. ज. कांबळे, उपविभागीय अभियंता ब. व्ही. जीवने यांनी प्रत्यक्ष उपोषणस्थळी भेटून प्रभाकर देशमुख यांना दिले व आश्‍यचर्याची बाब म्‍हणजे लगेच रखडलेल्या कामाला सुरुवातही करण्यात आली.

यामुळे 14 गावात हरितक्रांती
यावेळी देशमुख म्हणाले, या योजनेच्या माध्यमातून १४ गावात हरितक्रांती होणार आहे. शेतकऱ्यांच्या घरात गेल्या २० वर्षापासून पसरलेला अंधार दूर होणार आहे. तसेच या भागातील हजारो शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे पाणी मिळणार आहे. अनेक आंदोलन, उपोषणे, रास्ता रोको करूनही अधिकाऱ्यांना जाग आली नाही. मात्र प्राणांतीक उपोषणाचे हत्यार उपसताच डाव्या व उजव्या कालव्याची रखडलेली कामे त्वरित सुरु करण्यात आली. यावेळी उपसभापती साधना देशमुख, दत्ता मुळे, सर्जेराव चवरे, पप्पू पाटील, कुमार गोडसे, विकास जाधव, बालाजी शेळके, राजकुमार पाटील, नाना कौलगे, विलास शेळके, यांच्यासह शेतकरी व महिला मोठया संख्येने उपस्थित होते.
 
 
बातम्या आणखी आहेत...