आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैष्णवजन झाले अभंगात दंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पूर्णज्ञानाचे मूर्तिमंत प्रतीक असणारे, श्री विठ्ठलाचा प्राणसखा असणारे संत ज्ञानेश्वर महाराज असे वर्णन केले जाते, हे शब्दही अपुरेच पडतात. म्हणूनच संत चोखामेळा यांनी वरील अभंग रचनेतून ज्यांचे सार्थ वर्णन केले. अशा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण आज माळशिरस तालुक्यातील खुडूस फाटा येथे अपूर्व उत्साहात पार पडले

आनंदाचेउमटले तरंग
रिंगणसोहळ्यानिमित्त आनंद तरंगाच्या डोहात वारकरी डुंबून निघाले. ते नाचले, गायले. फुगड्या खेळत त्यांनी आनंद व्यक्त केला. सकाळी ९. ३० वाजता गोल रिंगणास प्रारंभ झाला. रिंगणात मध्यभागी पालखी आली. रामभाऊ चोपदार यांनी व्यवस्थेची पाहणी केली. व्यवस्थित रिंगण आखून घेतले. गोल रिंगणावर फुलांच्या पायघड्या होत्या. रांगोळ्या रेखाटल्या.
राजू मुलाणी अकलूज जगद्गुरूसंत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आज गुरुवार माळीनगर येथे उभे रिंगण झाले. अकलूज ते बोरगावपर्यंतच्या या पालखीच्या प्रवास मार्गात सर्वत्र भक्तीचे मळे फुललेे होते.

अकलूज मुक्काम उरकून संत तुकोबांची पालखी माळीनगरमध्ये सकाळी साडेआठला दाखल झाली. वाजता उभ्या रिंगणास सुरुवात झाली. या रिंगणात बाभूळगावकरांचा मानाचा अश्व धावल्यानंतर कै. प्रतापसिंह मोहिते यांच्या शौर्य या अश्वाने दोन फेऱ्या मारल्यानंतर रिंगण समाप्त झाले. त्यावेळी वारकऱ्यांनी नामघोषात गजरात फुगड्यांचे फेर धरले.
मॉडेल हायस्कूलच्या मैदानावर पालखी विसावली. येथे सौ. ललिता केशव बोरावले या दांपत्याच्या हस्ते पाद्यपूजन झाले. माळीनगर साखर कारखान्याच्या वतीने सुमारे पाच हजार वारकऱ्यांना अन्नदान करण्यात आले. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र गिरमे आदी उपस्थित होते. दुपारी १२ वाजता पालखी महाळुंगच्या दिशेने मार्गस्थ झाली. पालखी बोरगावात विसावली. सगळीकडे विठ्ठलमय वातावरण होते.
सकाळी बोरगावहून पालखीचे प्रस्थान. दुपारचा मुक्काम माळखांबीला आहे. तोंडले-बोंडले येथे धावा होईल. आज पिराची कुरोली येथे मुक्काम राहील.

पठाण करतात भोजन व्यवस्था
श्रीपूरलामौला पठाण यांच्या कुटुंबीयांतर्फे हजार वारकऱ्यांची भोजन व्यवस्था करण्यात आली होती. त्यांच्या भावनेचा आदर राखून वारकरी बांधव भोजनाचा आनंद घेत होते. पठाण कुटुंबीय दरवर्षी पालखीतील वारकऱ्यांना अन्नदान करते.

पालखीमार्ग भक्तीचे मळे
अकलूजते बोरगाव या १८ कि. मी. लांबीच्या पालखी मार्गावर सर्वत्र भक्तीचे मळे फुललेले दिसत होते. गावे, वाड्या, वस्त्या, शिवारं वारकऱ्यांनी पांढरीशुभ्र झालेली होती. ज्ञानबा तुकारामांच्या गजराने भक्तीला उधाण आले होते.

अतिक्रमण काढल्याचा असा राग
माळीनगरमहाळुंग, महाळुंग गट नं. सेक्शन २५/४, श्रीपूर येथील अतिक्रमणे पालखी सोहळ्याच्या नावाखाली हटवली गेल्याने दरवर्षीच्या तुलनेत यंदा वारकऱ्यांना सेवा पुरवण्यात फारसा उल्हास नव्हता. अनेकांनी दिंड्या जेवू घातल्या नाहीत. पालखीला काळे झेंडे दाखवण्याचे जाहीर करण्यात आले होते परंतु तसा प्रकार घडला नाही.

वेळ : सकाळी साडेनऊची
स्थळ : खुडूस फाटा
माउली पालखी मार्गावर
आज मुक्काम: भंडीशेगाव

माउलींच्या अश्वाची वेगवान दौड, स्वाराला मागे टाकले
रिंगणातसर्वप्रथम माउलींचा ध्वज घेऊन रिंगणात पाच फेऱ्या मारल्या गेल्या. यानंतर माउलींचा स्वाराने सर्वप्रथम रिंगणत वेगाने धावायला सुरवात केली. माउली, माउलीचा गजर सुरू झाला. डोळ्याचे पाते लवते लवते तोच माउलींच्या अश्वाने स्वाराच्या अश्वाला मागे टाकत वेगाने दौडत आघाडी घेतली. हाच क्षण वारकऱ्यांच्या सर्वाधिक उत्साहाचा ठरला. स्वाराला मागे टाकत माउलींचा अश्व दौडत राहिला. अशी तीन रिंगण झाली.

चोपदारांचा इशारा आणि स्तब्धता
शिस्तीचेदर्शन हा वारकऱ्यांचा स्थायी भाव. तो या रिंगण सोहळ्यावेळीच नाही तर संपूर्ण वारीत दिसून येतो. रामभाऊ चोपदार यांच्या एका इशाऱ्यासरशी वारी चालते. रिंगण सोहळा करते. शिस्तीचे दर्शन घडवित पुन्हा पंढरीकडे जाऊ लागते. रिंगण सोहळा संपल्याचा इशारा दंड उंचावून त्यांनी केला. एकही टाळ वाजला नाही. शिस्तीत सर्व वारकरी आपापल्या दिंडी क्रमाने वारीत सहभागी झाले.