आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभय योजना; १८,८९४ पैकी फक्त ७३७ व्यापाऱ्यांचे अर्ज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - आयातकेलेल्या मालावरील एलबीटी (स्थानिक संस्था कर) आॅगस्टपासून रद्द करण्याबाबत महापालिकेस अद्याप कोणतेच आदेश राज्य शासनाकडून प्राप्त झाले नाहीत. जून ते ३१ जुलैपर्यंत एलबीटीची थकबाकी भरणाऱ्या व्यापाऱ्यांना शासनाने ‘अभय योजना’ जाहीर केली. त्यास सोलापुरात थंडा प्रतिसाद आहे. शहरातील १८ हजार ८९४ व्यापाऱ्यांपैकी ७३७ व्यापारी या याेजनेत सहभागासाठी फार्म भरले, पण रक्कम भरून लाभ घेतलेला नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३१ जुलै ही एलबीटीची शेवटची तारीख जाहीर केली. परंतु पर्यायी कराची अद्याप घोषणा नाही. त्यामुळे एलबीटी हटवण्याबाबत शासन पातळीवर कोणताच निर्णय अद्याप नाही. दुसरीकडे एलबीटी वसूल करण्याबाबत महापालिका ठाम आहे. चालू आर्थिक वर्षात १८ जुलै २०१५ पर्यंत ३०.२९ कोटी रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा झाले. मागील वर्षी १८ जुलै २०१४ पर्यंत ३०.५८ कोटी जमा झाले होते. मनपाने प्रतिवर्षी १०० कोटी एलबीटी वसुली ग्राह्य धरली होती. पण, अपेक्षेनुसार एलबीटी वसुली झाली नाही. अनुप ज्वेलर्स वगळता शहरातील इतर सराफांचा एलबीटी कर आकारणीचा तिढा कायम आहे. थकीत एलबीटी भरण्यासाठी ३१ जुलै पर्यंत मुदत आहे.

एक आॅगस्टपासून करणार कारवाई
एलबीटीच्याअभय योजनेस अत्यल्प प्रतिसाद असून, एक आॅगस्टपासून महापालिका कारवाई करणार आहे. अभय याेजनेत सहभागी होण्यासाठी फार्म भरून त्यांनी असेसमेंट करून रक्कम भरावी. ७३७ व्यापाऱ्यांनी अभय योजनेत सहभागासाठी फार्म भरले पण रक्कम भरलेलेच या योजनेसाठी पात्र असतील. थकीत रकमेवर दंड व्याज आकारणी करण्यात येणार आहे. श्रीकांतम्याकलवार, मनपा उपायुक्त

महिनाअखेरपर्यंतमिळेल प्रतिसाद
एकदािववरणपत्र भरल्यानंतर पुन्हा भरण्याची आवश्यकता नाही, असे बऱ्याच व्यापाऱ्यांना वाटते. हा समज काढून टाकण्यासाठी चेंबर ऑफ कॉमर्सने विशेष बैठक घेऊन सर्व बाबी स्पष्ट करून सांगितल्या. योजनेला प्रतिसाद नाही, प्रत्यक्षात एकाच व्यापाऱ्याचे चार ते पाच फर्म असतात. त्याची आकडेवारी देत नाहीत. या महिन्याच्या अखेरपर्यंत या योजनेला मोठा प्रतिसाद मिळेल. राजूराठी, अभय योजना मसुदा समिती सदस्य
सहा व्यापाऱ्यांनी भरली एलबीटी
एलबीटी भरल्यास योजनेचा लाभ नाही
१८,८९४ मनपाकडे नोंदणी केलेले व्यापारी
२१००० एलबीटीसाठी विवरण पत्र भरलेले व्यापारी
११० चालू आर्थिक वर्षात ना हरकत घेतलेले शहरातील व्यापारी
७३७ अभय योजनेत सहभासाठी इच्छुक
शहरातील व्यापारी
लाख हजार २११ रुपये जमा
शासनाचीअभय योजना जाहीर झाल्यापासून मनपास फक्त सहा व्यापाऱ्यांकडून लाख हजार २११ रुपये जमा झाले आहेत. महापािलकेने केवळ अनुप ज्वेलर्सला एलबीटी थकीत नसल्याचा दाखला दिला आहे.

७३७ व्यापाऱ्यांकडून अर्ज
अभययोजनेसाठी व्यापाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नाही. ७३७ व्यापाऱ्यांकडून अर्ज अाले, पण त्यांनी विवरणपत्र सादर केलेले नाही. त्यामुळे ते अर्ज प्रलंबित आहेत. अर्जासोबत एलबीटी भरणे अपेक्षित आहे.

अभय योजनेत सहभागी होण्यास व्यापाऱ्यांनी विवरणपत्रासह अर्ज आणि रक्कम भरली तरच या योजनेसाठी ते पात्र असतील.

महापालिकेने असेंसमेट केल्यानंतर त्यांनी भरलेली रक्कम आणि महापालिकेने काढलेल्या रकमेत १० टक्केपेक्षा जास्त रक्कम असेल तर भरलेली रक्कम सोडून अन्य रकमेवर दंड व्याज आकारण्यात येईल.
बातम्या आणखी आहेत...