आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोळ्या देऊन गर्भपात केला, पतीसह सात जणांवर गुन्हा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - फॅब्रिकेशनच्या व्यवसायासाठी माहेरहून लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ केला. तसेच गोळ्या देऊन गर्भपात केल्याची फिर्याद हीना महंमदअली हौरा (वय १८, रा. बार्शी एस. टी. स्टँडपाठीमागे) यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्यात दिली आहे. हिना यांचा विवाह सात फेब्रुवारी २०१६ रोजी झाला. लगेच १५ दिवसानंतर पती महंमदअली हुमयुंग हौरा यांच्यासह वहिदा हुमयुंग हौरा, हुमयुंग हौरा, मुर्तुज हुमयुंग हौरा (रा. बार्शी) तसेच मावशी रुकसाना, बबलू त्याची पत्नी, आस्मा (रा. सर्व. कल्याणनगर, सोलापूर) यांनी त्रास देण्यास सुरुवात केली. दरम्यान गरोदर राहिल्यानंतर नवरा सासू यांनी गोळ्या खाऊ घालून गर्भपात केला असे फिर्यादीत म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...