आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे प्रवास : वर्षभरात सातशे प्रवाशांनी १८२ वर घेतली मदत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - रेल्वे प्रवासात एकट्या किंवा महिला प्रवाशांसाठी सुरू केलेल्या हेल्पलाइनचा सोलापूर विभागात सुमारे सातशे महिलांनी लाभ घेतला आहे. मध्य रेल्वे विभागातील हा आकडा सुमारे तीन हजार पेक्षा जास्त आहे. वर्षापूर्वी ही सेवा सुरू करण्यात आली होती. मदतीची ही सेवा फोन क्रमांक १८२ वर उपलब्ध आहे.

रेल्वेची या क्रमांकावरील सेवा टोल फ्री आहे. तसेच ही देशभरात उपलब्ध आहे. तक्रारींचा रोजचा अहवाल रेल्वे मंत्रालयाला पाठवावा लागतो. त्यामुळे स्थानिक प्रशासनाकडून गतीने कारवाई केली जाते. सोलापूर रेल्वे विभागातून रोज दोन ते तीन तक्रारी येतात. याचे लागलीच निरसन देखील केले जाते. ही २४ तास चालणारी सेवा आहे, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले. छेडछाड आणि अनारक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांचा त्रास अशा स्वरूपाच्या तक्रारींचे प्रमाण जास्त असल्याचेही सांगण्यात आले.

तक्रार करतेवेळी प्रवाशाचे नाव, तिकिटाचे पीएनआर क्रमांक, डबा सीट क्रमांक सांगा. रेल्वे दुसऱ्या विभागाच्या हद्दीत असली तरीही नियंत्रण कक्षातील रेल्वे पोलिस दलाच्या सुरक्षा कक्षाकडून संबंधित विभागाच्या नियंत्रण कक्षास संदेश दिला जातो. पुढील स्थानकावर मदतीसाठी पोलिस हजर असतात.

पारदर्शकतेसाठी प्रतिक्रिया अर्ज
तक्रारकेल्यानंतर किती वेळेत आणि समाधानकारक मदत मिळाली वा नाही याची माहिती प्रवाशांकडून घेण्यात येते. त्यासाठी तक्रार निवारण केल्यानंतर प्रवाशांकडून प्रतिक्रिया अर्ज भरून घेतला जातो.
एकट्या प्रवासकरणाऱ्या विशेष करून महिला प्रवाशांसाठी १८२ ही हेल्पलाइन खूप महत्त्वाची आहे. प्रवासात सुरक्षेसंदर्भातली कोणतीही अडचण आल्यास प्रवाशांनी निश्चितपणे याची मदत घ्यावी. त्यांना नक्कीच मदत मिळेल.” ए.के. सिंग, मुख्य सुरक्षा आयुक्त, आरपीएफ, मुंबई, मध्य रेल्वे विभाग
बातम्या आणखी आहेत...