आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खूनप्रकरणी फरार तिघे गजाआड, उस्मानाबादमधील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- खुनाच्या गुन्ह्यात गेल्या दहा महिन्यांपासून पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने गजाआड केले. ही कारवाई गुरुवारी (दि.२३) पहाटे कळंब येवता (ता. केज) येथे करण्यात आली.

२० ऑगस्ट २०१५ रोजी भूम येथील शंकर बापू काळे यांचा आपापसातील वादातून खून करण्यात आला होता. याप्रकरणी सुरेश श्यामराव पवार, महादेव श्यामराव पवार राहुल बबन काळे या तिघांविरोधात गुन्हा नोंद झाला होता. परंतु, तेव्हापासून हे फरार होते. दरम्यान, यातील सुरेश पवार हा कळंब येथे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हरिष खेडकर यांना मिळाली. त्यांनी पोलिस अधीक्षक अप्पर अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांच्या मदतीने कळंब येथे छापा टाकून गुरुवारी पहाटे १.३० वाजता सुरेश पवार राहुल काळे या दोघांना अटक केली. त्यांच्याकडे विचारपूस केल्यानंतर तिसरा आरोपी महादेव पवार हा येवता येथे असल्याची माहिती मिळताच तत्काळ तिकडे धाव घेऊन त्यालाही गजाआड केले. तिघांनाही पुढील तपासासाठी भूम पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईत उपनिरीक्षक आवटे, कर्मचारी घुगे, निरगुडे, रोकडे, जाधव, वाघमारे, सुरवसे, काेळी, थोरात, अमोल पवार, कुंभार, कदम यांनी सहभाग घेतला.
बातम्या आणखी आहेत...