आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वीकृतांची मोर्चेबांधणी ‘लक्ष्य’ प्रभागात निधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिकेत पाच नगरसेवक स्वीकृत केले जातात. त्यांचा विशेष असा वॉर्ड किंवा प्रभाग नसतो. त्यामुळे त्यांनी त्यांच्या वाट्याला येणारा निधी पूर्ण शहराच्या समस्या लक्षात घेऊन खर्च करणे अपेक्षित आहे. मात्र, विद्यमान पाचही नगरसेवकांनी पुढील निवडणुकीची तयारी करत काही प्रभागांना लक्ष्य केले आहे. तेथे विकासकामाचा धडाका लावत बहुतांश निधी आपल्या सोयीच्या प्रभागातच खर्च करत आहेत.

महापालिका निवडणुकीची चाहुल सर्वच राजकीय पक्षाबरोबर स्वीकृत नगरसेवकांना लागली आहे. मनपातील पाचही स्वीकृत नगरसेवकांना शहरात सर्वत्र निधी देता येतो. पण त्यांनी ठराविक प्रभागावर लक्ष केंद्रित करून शेवटच्या वर्षाचा निधी वाटप केला. भांडवली कामासाठी एका नगरसेवकासाठी ५० लाख निधी देण्यात आला. त्यासाठी महापालिका सभागृहात एकमताने अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले.

नगरसेवकप्रा. अशोक निंबर्गी (भाजप) : जास्तनिधी रस्ते काँक्रिट, बोअरसाठी दिला. २० कामांपैकी १२ कामे प्रभाग क्रमांक सातमध्ये वाटप केली. अन्य तीन कामे त्याच प्रभागासाठी प्रभाग तीनमधून बदलून दिली. हा प्रभाग भाजपचे नगरसेवक संजय कोळी नरसूबाई गदवालकर यांचा आहे. निंबर्गी याच प्रभागात राहतात. त्यांनी हद्दवाढ भागाच्या विकासासाठी भांडवली कामाचे १९.५ कोटी निधी द्यावा, शहराचा समान विकास कामासाठी समान निधी अशी भूमिका होती.

नगरसेवक शैलेंद्र आमणगी (शिवसेना) : ते जुळे सोलापुरात राहतात. तेथून निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. शेवटच्या वर्षाचा ५० लाखांचा निधी ४५, ४८, ४६ या प्रभागात दिला. येथे मतदार युतीच्या बाजूने असतात. भाजपचे नरेंद्र काळे, शिवसेनेचे राजश्री बिराजदार हे नगरसेवक आहेत.

नगरसेवक दीपक राजगे (राष्ट्रवादी) : अवंतीनगर परिसरातील प्रभाग क्रमांक १२ मध्ये सर्वाधिक निधी दिला. तेही तेथून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. येथे काँग्रेसचे देवेंद्र कोठे आणि शिवसेनेचे अंजली चौगुले हे नगरसेवक आहेत.

अॅड.यू. एन. बेरिया (काँग्रेस) : ५०लाखांच्या कामाचा अभिप्राय अद्याप घेतला नाही. प्रभाग रचना जाहीर झाल्यावर निधी देण्याची शक्यता आहे. त्यांच्या चिरंजीवास निवडणूक लढवण्याची इच्छा आहे.

नगरसेवक राजा खराडे (काँग्रेस) : ५०लाखांच्या कामाचा अभिप्राय अद्याप घेतला नाही.

तेथे इच्छुक अाहे
चार वर्षे शहरात इतर भागात निधी दिला. मी प्रभाग क्रमांक १२ मध्ये निवडणुकीसाठी इच्छुक असून, शेवटच्या वर्षी जास्त निधी तेथे आवश्यकतेनुसार खर्च केला. दीपक राजगे, स्वीकृत नगरसेवक, राष्ट्रवादी

मागणी त्यांना निधी
मला निवडणूक लढवण्याची इच्छा नाही. संघटन पातळीवर काम करणार आहे. माझ्याकडे कोण निधी मागितला, त्यांना दिला. जास्त निधी बोअरसाठी दिला. प्रा.अशोक निंबर्गी, स्वीकृत नगरसेवक, भाजप
बातम्या आणखी आहेत...