आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दोन अपघात : घोंगडे वस्तीत तरुण तर कोंडी येथे वृद्ध ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - घोंगडे वस्तीयेथील नागरी बँकेजवळ सायंकाळी साडेपाच वाजता मालट्रकने पाठीमागून ठोकरल्याने गौस इमाम पटेल (वय १९, रा. गुजरवस्ती, दयानंद महाविद्यालयजवळ) हा युवक मृत्यमुखी पडला. मृत गौस एका खासगी कंपनीत कामाला होता. त्याचे वडील मजुरी करतात. चार बहिणी आहेत. भाऊ नाही. गौस हा मित्रासोबत दुचाकीवरून कुंभार वेसकडे जात होता. भुसारमाल घेऊन कुंभारवेसकडे येणाऱ्या मालट्रकने मागून धडक दिल्याने त्याच्या हातास पोटाला गंभीर दुखापत झाली. खासगी रुग्णालयात उपचारदरम्यान त्याचा मृत्यू झाला. जोडभावीपेठ पोलिस स्टेशनमध्ये याची नोंद आहे. सहाय्यक फौजदार हरिभाऊ गुरव तपास करीत आहेत.
ज्येष्ठ नागरिक ठार : कोंडीपरिसरातील राहुटी (ता. उत्तर सोलापूर) येथून पायी घरी जाणाऱ्या चंद्रकांत तुळशीराम अलकुंटे (वय ६०, रा. बीबीदारफळ) यांना समोरून भरधाव येणाऱ्या अल्टोकारने (एमएच १४ डीए ५८७१) धडक दिली. ही घटना दुपारी अडीच वाजता घडली.
बातम्या आणखी आहेत...