आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्घटनेनंतर करण्यात येते दिखाऊ कारवाई, मार्केट यार्ड चौकामध्ये १५ दिवसांत सिग्नल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मार्केटयार्डसमोर झालेल्या अपघातांत २४ तासांत जणांना आपल्या प्राणास मुकावे लागले. जनभावना ओळखून दुसऱ्याच दिवशी अतिक्रमण हटवण्यात आले. त्याचे फोटोसेशनही झाले. पण अतिक्रमणाचे साहित्य तेथेच ठेवल्यामुळे रस्ता अद्याप मोकळा झालेला नाही. दुर्घटनेत एखादा जीव गेला की तात्पुरती कारवाई करायची आणि घटना विस्मरणात गेली की अतिक्रमण फोफावू द्यायचे. त्याकडे कानाडोळा करायचा हा प्रकार नेहमीचाच होऊन बसला आहे. बसस्थानक, शिवाजी चौक हा परिसरही याला अपवाद नाही. येथील अतिक्रमण हटवण्यासाठी पालिका आणि वाहतूक पोलिस कोणाच्या तरी मरणाची वाट पाहात आहेत का? असा सवाल निर्माण होत आहे. पांजरापोळ चौकातील अतिक्रमणाबाबत ओरड सुरू होते तेव्हा अतिक्रमण टप्पा पूर्ण करण्यासाठी महापालिकेने तयारी दर्शवली अाहे. यार्डातील व्यापारी, उद्योजक यांचीही मदत घेऊन सीसीटीव्ही यंत्रणा सुरू करू. लोकवगर्गणीतून हे काम करण्याचा मानस असल्याचे श्री. अमृतकर म्हणाले. 

अवजड वाहन बंदी काळात पुणेहून हैदराबादकडे विजापूरकडे जाणारी वाहने या चौकात थांबबात. जड वाहने थांबण्यासाठी वेगळा सर्व्हिस रस्ता तयार करण्यात येणार अाहे. तसेच हैैदराबादकडे विजापूरकडे जाण्यासाठी अनेक ठिकाणी दिशादर्शक फलक लावणार अाहे. 

या चौकातील एक निरीक्षण : मार्केटयार्ड चौकात सायकलस्वार दुचाकीस्वार चुकीच्या दिशेने अोव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतात. अवजड वाहने बंदीच्या काळात थांबतात. त्यानंतर वाहतूक सुरू होते तेव्हा रस्ता पार करण्यासाठी बेफाम वाहने चालवली जातात. आता अतिक्रमणे वाढली अाहेत. तरीही कार, टेम्पो, ट्रक आदी वाहने अधिक काळ थांबून असतात. नागिरकांनी शिस्त पाळली आणि चुकीच्या दिशेने ये-जा करणे थांबवले तर अनेक अपघात टळू शकतील. चौकातील पोलिस पथकाने दंडात्मक कारवाईबरोबरच सक्षम वाहतूक नियोजन करणे गरजेचे आहे. असे झाले तरच अपघातांवर नियंत्रण मिळवणे शक्य होईल. 
 
दुर्घटनेनंतर करण्यात येते दिखाऊ कारवाई 
हटाव मोहीम राबवली जाते. सध्या या परिसरात रस्त्याच्या दोन्ही कडेला हातगाड्या बोकाळल्या आहेत. भजी गाड्या आहेत. कुठेही उभारणाऱ्या रिक्षाही घुटमळत असतात. परिणामी येथून वाहन वळवताना नाकीनऊ येते. येथे तैनात वाहतूक शाखेचे पोलिस बघ्याच्या भूमिकेत असतात. 
 
महापालिकेच्या फरशा अडथळा करताहेत 
अपघातामध्ये निष्पापांचा जीव जातो. याची कोणालाच पर्वा नसते. महापालिका आणि वाहतुक पोलिस एक दिवस कारवाईचे नाटक करतात. नंतर दोन चार दिवसांनी परिस्थिती जैसे थे. याची प्रचिती शुक्रवारी मार्केट यार्ड समोरील वाहतुक पोलिसांच्या कर्तव्य बजावणीवरून येते. यार्डसमोरून शेळगीकडे जाणाऱ्या सर्व्हीस रस्त्यावर ट्रक उभारण्यात आले आहेत. याच परिसरातील शांती नगर येथे अंतर्गत रस्त्यावर फरशीकरण करण्यासाठी महापालिकेने रस्त्यावर नवीन फरशा आणून ठेवल्या आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. 

रास्ता राेकोपूर्वीच कार्यकर्ते ताब्यात 
मार्केट यार्डसमोर दोन दिवसांपूर्वी एका तरुणीचा अपघाती मृत्यू झाला. याप्रकरणी प्रशासनाचा निषेध व्यक्त करत शुक्रवारी दुपारी मनसे शहराध्यक्ष युवराज चुंबळकर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला. दुपारी एक वाजता आंदोलन करण्यात येणार असल्यामुळे सकाळी दहा वाजता पोलिसांचा फौजफाटा जमला. दुपारी १.२५ वाजता चुंबळकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते जमले. रास्ता रोको करण्यापूर्वीच पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले. पोलिस वाहनात बसून जाताना कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. युवराज चुंबळकर, उमेश रसाळकर, प्रशांत इंगळे, राहुल पाटील, बाळासाहेब, दिनेश कुलकर्णी, रवी गायकवाड, रवी शिंदे, भारती मन्सावाले, सकट, केरडे आदी काही कार्यकर्ते उपस्थित होते. 

यार्ड परिसरातील अतिक्रमण नष्ट केले. त्याचे साहित्य तेथील लोक घेऊन जाणार होते. ते घेऊन गेले नाही तर आम्ही लगेच ते उचलून रस्ता मोकळा करतो. पांजरापोळ चौक येथे स्टॉल पेक्षा हातगाड्या जास्त आहेत. अतिक्रमणाचे वाहन पाहताच ते पळ काढतात. त्यासाठी वाहतुक पोलिस आणि महापालिका यांची संयुक्त मोहीम घेऊन हा रस्ता मोकळा करू. 
विजय राठोड, अतिक्रमण प्रतिबंधात्मक विभाग प्रमुख, महापालिका
 
मार्केट यार्ड चौकामध्ये १५ दिवसांत सिग्नल 
टप्पापूर्ण करण्यासाठी महापालिकेने तयारी दर्शवली अाहे. यार्डातील व्यापारी, उद्योजक यांचीही मदत घेऊन सीसीटीव्ही यंत्रणा सुरू करू. लोकवगर्गणीतून हे काम करण्याचा मानस असल्याचे श्री. अमृतकर म्हणाले. 
अवजड वाहन बंदी काळात पुणेहून हैदराबादकडे विजापूरकडे जाणारी वाहने या चौकात थांबबात. जड वाहने थांबण्यासाठी वेगळा सर्व्हिस रस्ता तयार करण्यात येणार अाहे. तसेच हैैदराबादकडे विजापूरकडे जाण्यासाठी अनेक ठिकाणी दिशादर्शक फलक लावणार अाहे. 

या चौकातील एक निरीक्षण 
मार्केट यार्ड चौकात सायकलस्वार दुचाकीस्वार चुकीच्या दिशेने अोव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतात. अवजड वाहने बंदीच्या काळात थांबतात. त्यानंतर वाहतूक सुरू होते तेव्हा रस्ता पार करण्यासाठी बेफाम वाहने चालवली जातात. आता अतिक्रमणे वाढली अाहेत. तरीही कार, टेम्पो, ट्रक आदी वाहने अधिक काळ थांबून असतात. नागिरकांनी शिस्त पाळली आणि चुकीच्या दिशेने ये-जा करणे थांबवले तर अनेक अपघात टळू शकतील. चौकातील पोलिस पथकाने दंडात्मक कारवाईबरोबरच सक्षम वाहतूक नियोजन करणे गरजेचे आहे. 
बातम्या आणखी आहेत...