आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुळजाभवानीच्या दर्शनाला निघालेले तीन भाविक ठार, पुलावरून नदीत कोसळली बोलेरो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खर्डा-भूम रोडवरील नळी पुलाजवळ झालेल्या या अपघातामध्ये पुलाचे कठडे तोडून बोलेरो पीकअप पुलावरून खाली कोसळली.
ईट- भूम तालुक्यातील अंतरवली गावाजवळ रविवारी (दि.१०) महिंद्रा बोलेरो पीकअपमधून तुळजापूर येथे दर्शनाला जात असताना रात्री दोनच्या सुमारास समोरच्या वाहनाचा डोळ्यांवर प्रकाश पडल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातामध्ये तिघे ठार तर १९ जण जखमी झाले आहेत. खर्डा-भूम रोडवरील नळी नदीच्या पुलाजवळ झालेल्या या अपघातामध्ये पुलाचे कठडे तोडून बोलेरो पुलावरून खाली ५० फूट खोल नदीत कोसळली.

पोलिस सूत्रांनुसार, भाविक महिंद्रा बोलेरोने तुळजापूर येथील तुळजाभवानीच्या दर्शनासाठी निघाले असताना हा अपघात झाला. जखमींना अहमदनगर, जामखेड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. साहेबराव आश्रुराव शिंदे (रा. कामठी, ता. श्रीगोंदा), विठोबा यशवंत मदने (रा. राळेगण, ता. पारनेर), हारूबाई श्रीरंग शेंडगे (रा. वाडगाव) यांचा अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. जखमींमध्ये परसराम भाऊसाहेब शिंदे, लहू साहेबराव शिंदे, छाया लहू शिंदे, गायत्री लहू शिंदे, सूरज लहू शिंदे, सोपान लहू शिंदे, अंकुश साहेबराव शिंदे, सोनाली अंकुश शिंदे, कृष्णा अंकुश िशंदे, विद्या अंकुश शिंदे, आसराबाई अंकुश शिंदे, लंका सुभाष शिंदे, सुमन गंगाधर शिंदे, सुनंदा महादेव शिंदे, कुणाल मोहन शिंदे, जयश्री सतीश आरदे, राणी विष्णू आरदे, वंदना अशोक आरदे, यमुना एकनाथ गव्हाणे यांचा समावेश आहे. याप्रकरणी अंभी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष तांबे करीत आहेत.