आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रात्री चहा पिण्‍यासाठी बाहेर आलेल्‍या 3 विद्यार्थ्‍यांचा करुण अंत, सोलापूरमधील घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमेश माळगे, अक्षय आसबे, दिपक गुमडेल यांचा अपघातात मृत्‍यू झाला आहे. - Divya Marathi
संगमेश माळगे, अक्षय आसबे, दिपक गुमडेल यांचा अपघातात मृत्‍यू झाला आहे.

सोलापूर- रात्रभर ग्रंथालयात अभ्यास केल्यानंतर चहासाठी पहाटे दुचाकींवरून हॉटेलकडे निघालेल्या नागेश करजगी ऑर्किड अभियांत्रिकीच्या तीन विद्यार्थ्यांचा अनोळखी वाहनाच्या धडकेने मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला. रविवारी पहाटे तळेहिप्परग्याजवळ हा अपघात झाला. अपघातस्थळाचे दृश्य थरकाप उडवणारे होते. अपघातानंतर चौघेही जवळपास अर्धा तास तेथेच पडून होते. पहाटे तीनच्या सुमारास पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. मृत्युमुखी पडलेले तिघेही त्यांच्या घरातील एकुलते एक होते. 


दीपक जयंत गुमडेल (वय २२, रा. पूर्व मंगळवार पेठ, सोलापूर), संगमेश मडोळप्पा माळगे (वय २०, रा. घोंगडेवस्ती, भवानी पेठ), अक्षय िवजय अासबे ( वय २१, रा. लक्ष्मीनगर, प्रतीक्षा बंगला, मुरारजी पेठेजवळ) अशी मृतांची नावे आहेत. हेमंत बसवराज थळंगे (वय २१, रा. गुरुवार पेठ, सोलापूर) हा तरुण जखमी असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू अाहेत. मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. 


ऑर्किड अभियांत्रिकीचे अनेक विद्यार्थी रात्री अभ्यासासाठी महाविद्यालयातील ग्रंथालयात जातात. परीक्षा जवळ आल्यामुळे मेकॅनिकलच्या तिसऱ्या वर्षात शिकणारे दीपक, संगमेश, अक्षय हेमंत चौघेजणही ग्रंथालयात गेले होते. पहाटे अडीचच्या सुमाराला चहा पिण्यासाठी हगलूरजवळील ढाब्यावर जाताना प्राची हाॅटेलजवळ पाठीमागून अवजड वाहनाने त्यांच्या दुचाकींना धडक दिली. ते काही अंतर फरपटत गेले. रक्तस्त्राव झाल्यामुळे चौघेही रस्त्याच्या कडेला बेशुद्ध पडले. दुचाकींचा चुराडा झाला. तीनच्या सुमारास एका व्यक्तीने हा अपघात पाहून सोलापूर तालुका पोलिसांना कळवले. त्याच दरम्यान तेथून जाणाऱ्या गस्तीवरील पोलिसांनी चौघांना शासकीय रुग्णालयात अाणले. फौजदार बी. एस. बिराजदार, सहायक फौजदार नेताजी बंडगर, हवालदार सदाशिव गवळी, विक्रम दराडे यांनी मदत केली. धडक दिलेल्या वाहनाचा शोध सुरू असल्याचे फौजदार बिराजदार यांनी सांगितले. मध्यरात्री अडीचच्या सुमारास या चौघांना चहाची तलफ झाल्यामुळे दोन दुचाकींवरून ते हाॅटेलकडे निघाले होते. अवजड वाहनाने त्यांना ठोकरले. धडक देणारा वाहनचालक वाहनासह पसार झाला. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो... 

बातम्या आणखी आहेत...