आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साेलापूर: पुलाच्या कठड्यावरून ट्रक कालव्यात कोसळला; ३ ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोडनिंब (जि. साेलापूर) - सिमेंट भरून पुण्याकडे निघालेल्या मालट्रक चालकाचा ताबा सुटल्याने सोमवारी पहाटे पावणे तीन वाजता पुलाची लोखंडी पट्टी तोडून ट्रक कालव्यात पडून तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. सोलापूर- पुणे महामार्गावरील भीमानगर (ता. माढा) येथे साेमवारी पहाटे तीनच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मृतांपैकी दाेघांचीच अाेळख पटली अाहे.
चालक शिवाजी कांबळे (वय २६ रा. पेठ सांगवी ता. उमरगा जि. उस्मानाबाद) आणि गौरव रघुनाथ गुणे (३२ रा. शिवळी, जि. लातूर) अशी मृतांची नावे अाहेत. तिसऱ्या ३० वर्षीय मृताची अाेळख अद्याप पटलेली नाही. कालव्यात मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे या तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात ट्रकची केबिन पूर्णपणे चक्काचूर झाली. सकाळी सात वाजेच्या सुमारास क्रेनच्या मदतीने मालट्रक बाहेर काढण्यात आला.
दुसरा अपघात; अनर्थ टळला
या अपघातामुळे भीमानगर येथे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अपघात स्थळापासून अर्धा किलोमीटर अंतरावर उभ्या असलेल्या माल ट्रकवर एका खासगी बस डाव्या बाजूने जाेरदार अादळली. सुदैवाने बसमध्ये काेणीही प्रवाशी नसल्यामुळे दुसरा माेठा अपघात टळला.
गतवर्षी सात जणांचा बळी
१९ फेब्रुवारी २०१५ मध्ये मध्यरात्री ऊसतोड मालकाची नजर चुकवून पळून जात असताना पुलाचा अंदाज न आल्याने ऊसतोड मजुरांचा ट्रॅक्टर याच ठिकाणी कालव्यात पडून मजुरांचा मृत्यू झाला होता.
बातम्या आणखी आहेत...