आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Accident Near Dudhani Solapur, Two People Killed In Incident

दुधनीजवळील अपघातात सोलापूरचे दोन जण ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- उमेश जंगम आणि अभय मंगलपल्ली) - Divya Marathi
(फोटो- उमेश जंगम आणि अभय मंगलपल्ली)
अक्कलकोट- मैंदर्गी-दुधनी रस्त्यावर शक्करपीर दर्ग्यानजीक मालवाहतूक टमटमने पाठीमागून मोटारसायकलला जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील दोघेही तरुण जागीच ठार झाले. बुधवारी (दि. १२) दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात झाला. उमेश दत्तात्रय जंगम (वय २४, रा. माधवनगर, सोलापूर) अभय सुधाकर मंगलपल्ली (वय २४, रा. विडीघरकुल, जवाहरनगर, सोलापूर) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. याची दक्षिण पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
उमेश जंगम अभय मंगलपल्ली हे दोघेही वैद्यकीय प्रतिनिधी (मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह) म्हणून काम करतात. ते मोटारससायकल (एम एच १३ बी एल ६२५४) वर दुधनीला गेले होते. तेथून अक्कलकोटकडे येत होते. वाटेत शक्करपीर दर्ग्याजवळ पाठीमागून येणाऱ्या मालवाहतूक टमटमने (क्र. एम एच १३ एन ९७५४) ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मोटारसायकलला जोरात धडक दिली. मोटारसायकलवरील दोघेही खाली पडल्याने त्यांच्या डोक्यास हातापायास जबर मार लागला. त्यामुळे ते जागीच ठार झाले. तेथून निघालेल्या वाहनचालकांनी पोलिस ठाण्याला खबर दिली. दरम्यान टमटमचालकाने पलायन केले. श्रीनिवास सिद्धय्या गरदास (वय ४८, रा.सोलापूर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरून टमटमचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. फौजदार सुयोग वाईकर तपास करीत आहेत.