आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रकार सपारचा अपघाती मृत्यू, दुचाकीला ट्रकने पाठीमागून ठोकरले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - तुळजापूररोडवर ट्रकने ठोकरून चाकाखाली फरपटत नेल्याने येथील युवा चित्रकार प्रतीक व्यंकटेश सपार यांचा मृत्यू झाला.
प्रतीक व्यवसायिक चित्रकार होते. ते आणि त्यांचे मित्र गिरीश राजवाणी दुचाकीवरून सोलापूर -तुळजापूर रस्त्यावर जात होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ट्रकने (जीजे १२, एव्ही ९६१२) त्यांना मागून जोराची धडक दिली. यात पाठीमागे बसलेले प्रतीक ट्रकच्या चाकाखाली सापडले. त्यांचे दोन्ही पाय पाठीमागील मधल्या टायरमध्ये अडकले. पूर्णत: त्यांचे सर्वांग सोलवटून निघाले, अशी माहिती पाहणाऱ्यांनी सांगितली. जोडभावी पेठ ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल जाधव यांनी उपचारासाठी प्रतीक यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

सचिन तेंडुलकर आणि प्रतीक
मध्यंतरी सचिन तेंडुलकर सोलापुरात आल्यावर प्रतीक यांनी काढलेले सचिनचे पोस्टर सचिनला भेट देण्यात आले होते. प्रतीक यांनी मुंबईच्या जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये चित्रकारीतेचे धडे गिरवले होते. ते आपले वडील व्यंकटेश सपार यांच्यासमवेतच कमर्शिअल आर्टिस्टचे काम करत होते.
बातम्या आणखी आहेत...