आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसपोर्टसाठी उर्वरित जागेचे संपादन करा, विजयकुमार देशमुख यांनी दिला आदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - बसपोर्टसाठी आवश्यक असणाऱ्या जागेचे भूसंपादन करण्यात यावे, लवकरात लवकर येथे बसपोर्ट उभे राहावे, यासाठी परिवहन राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांनी बैठक घेतली. आवश्यक त्या जागेचे भूसंपादन करून अहवाल द्यावा, असे आदेश त्यांनी दिले.
पुणे नाका येथे शासनाची जवळपास हेक्टर ७२ चौरस मीटर एवढी जागा आहे. यापैकी १.५५ हेक्टरची जागा १९९२ पासून एसटीच्या ताब्यात आहे. या जागेवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून बसपोर्ट बांधण्यात येणार आहे. मात्र १.५५ हेक्टरच्या जागेवर बसपोर्टची वास्तू उभारली जाऊ शकत नाही. त्यामुळे उर्वरित जागांचे भूसंपादन करून ती जागा एसटी प्रशासनाला मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

सोमवारी सायंकाळी विश्रामगृह येथे विजयकुमार देशमुख यांनी या संदर्भात बैठक बोलवली होती. त्यावेळी उप जिल्हाधिकारी दिनेश भालेदार, विभाग नियंत्रक श्रीनिवास जोशी आदी अधिकारी उपस्थित होते. जुना पुणे नाका येथील जागेवर जमीन मालकाने दावा सांगितल्याने भूखंड क्र. ५८, ६१ ७७ या जमिनी एसटीच्या ताब्यात देण्यात आल्या नाहीत. जमीनमालकांनी या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितल्यानंतर हे प्रकरण स्थानिक पातळीवर सोडविण्यात यावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यानंतर या प्रकरणांवर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. तेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयाने तोडगा काढावा असा निर्णय झाला.
बातम्या आणखी आहेत...