आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाल लैंगिक शोषणाविरुद्ध "चुप्पी तोडो'चा नारा बुलंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - बालकांच्या लैगिंक शोषणासंदर्भात समाजात जनजागृती करण्यासाठी कॅक्टस फाउंडेशनच्या वतीने रविवारी शहरातून रॅली काढण्यात आली. शहरातील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या रॅली सहभाग घेत बाल लैंगिक शोषणाविरोधात "चुप्पी तोडो 'चा नारा दिला.
कॅक्टस फाउंडेशनतर्फे या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जुना एम्प्लॉयमेंट चौक येथून रॅलीस प्रांरभ झाला. रॅलीचे उद्घाटन पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांच्या हस्ते झाले. यावेळी मनीषा सेनगावकर, अश्विनी सानप, शर्मिष्ठा वालावलकर, सुमन शिंदे, सुधा साळुंखे, समीर काकाणी, अनिल शर्मा, कॅक्टस फाउंडेशनचे फरहीन खान, रोहीम, नुसरत, मीनल पटेल, रामेश्वर आदींची प्रमुख उपस्थिती होती. बालकांच्या हक्काबाबत जागृती साधण्यासाठी आयोजक कॅक्टस फाउंडेशनने नाटुकली सादर केली. यानंतर नाच परफार्मन्स कडून बालिकांनी नृत्याविष्कार सादर केले.चुप्पी तोडो.. सोलापूर चुप्पी तोडो असा नारा देण्यात येत होता. शहरातील प्रमुख मार्गावर फेरी मारून हुतात्मा चौक येथे रॅलीचा समारोप झाला.

शोषण थांबले पाहिजे
पोलिसआयुक्त सेनगावकर म्हणाले, अनेक घटनांमध्ये लहान मुलांचे लैंगिक शोषण स्त्री- पुरुष दोघांकडूनही होत असल्याचे निदर्शनास येते. लहान मुलांवर होत असणाऱ्या या अन्यायाविरूद्ध लढण्यासाठी कॅक्टस संघटनांचे पदाधिकारी जागृती साधत आहेत. पोलिसांचेही सामाजिक कर्तव्य हेच आहे. लहान मुलांचे शोषण थांबले पाहिजे. मौनव्रत सोडून देत या विकृत्तीविरुद्ध लढायचे आहे, केवळ एक दिवसाच्या रॅलीने जागृती साधली जाईल अशी नाही पण ही सुरवात असेल.

ही जागृती मनात जागती ठेवा. या पुढे प्रत्येक सुजाण नागरिकांनी हे कर्तव्य समजून आपली चुप्पी तोडावी. पोलिसांशी संवाद साधा, निनावी कळवा पण चुप्पी तोडा. म्हणूनच बाल शोषणाची विकृती समाजातून नाहीशी होईपर्यंत हा लढा सुरू राहील, असे सेनगावकर म्हणाले.
जुना एम्प्लॉयमेंट चौक येथे फुगे सोडून रॅलीचे उद्घाटन करण्यात आले.

रॅलीत यांचा होता सहभाग
सिंहगडपब्लिक स्कूल, सिंहगड अभियांत्रिकी, सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम, सोशल उर्दू हायस्कूल, हिराचंद नेमचंद वाणिज्य महाविद्यालय, भारती विद्यापीठ, अरविंदधाम पोलिस लाइन, सीपी ऑफिस, श्राविका हायस्कूल, सोनामाता स्कूल, जैन सोशल ग्रुप, मिस्टी मिल्क, विडी घरकुल, अर्पित साईट वर्क्स, अश्विनी मेडिकल कॉलेज, जयभीम ग्रुप, ए.जी. पाटील अभियांत्रिकी, व्हीव्हीपी अभियांत्रिकी, आर्या वैद्य मंदिर, पोलिस ट्रेनिंग स्कूल.