आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतूक जनजागृतीसोबत कृतीसाठी व्हावा प्रयत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - अाजपासून वाहतूक सप्ताह सुरू होत असून तो २० जानेवारीपर्यंत चालणार अाहे. या कालावधीत पोलिस-अारटीअो यांच्याकडून वाहतूक जनजागृतीसाठी विविध उपक्रम केले जाणार आहेत. त्याशिवाय वाहतूक शिस्त लावण्यासाठी प्रत्यक्षात कृती करण्याची गरज अाहे. तरच सप्ताहाचा उद्देश सफल होईल.

यावरपाहिजे लक्ष : धूमस्टाइल बाइकस्वारांना ब्रेक, झेब्रा क्राॅस सिग्नल नियम पालन नाही, रिक्षाचालकांचा बेशिस्तपणा, अनेक दुचाकीवर फॅन्सी नंबर प्लेट, काही चारचाकी वाहनावर नंबर प्लेटच नाहीत. नो पार्किंग झोन, वन-वेचा अवलंब नाही, अशा समस्या आहेत. वाहतूक पोलिसही परराज्य जिल्ह्यातील वाहनांवर कारवाईत मग्न असतात. तेरा सिग्नल चाैकापैकी फक्त दोन चाैकातच सिग्नल सुरू अाहेत. सिग्नल चाैकात नियोजनाबाबत विचारल्यानंतर मनुष्यबळ कमी असल्याचे सांगितले जाते. दंडात्मक कारवाईसाठी मात्र अाठ-दहा पोलिस तैनात असतात. या बाबींचा विचार वाहतूक पोलिसांनी करण्याची गरज अाहे. तरच रस्ता सुरक्षा सप्ताहाचा उद्देश पूर्ण होईल.

सुरक्षा मोहिमेंतर्गत एसटी राबविणार कार्यक्रम
राज्य परिवहन महामंडळातर्फे १० ते २५ जानेवारीदरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताह राबविला जाणार आहे. एकही अपघात केलेल्या चालकांचा विशेष सत्कार केला जाणार आहे. सोलापूर एसटी विभागातील प्रत्येक आगारावर रस्ता सुरक्षासंदर्भात चालकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. चालकाचे प्रशिक्षण, वैद्यकीय तपासणी, समुपदेशन आदी उपक्रम घेतले जातील, अशी माहिती विभाग नियंत्रक श्रीनिवास जोशी यांनी दिली.