आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाँड नियमित न करणाऱ्या 188 डॉक्टरांवर कारवाई, ग्रामीण भागात सेवा बजावत नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साेलापूर - डॉ.व्ही. एम. शासकीय महाविद्यालयात एमबीबीएस पदव्युत्तर पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या डॉक्टरांना ग्रामीण भागात सेवा बजावणे बंधनकारक आहे. परंतु बहुतांश डॉक्टर सेवा बजावत नाहीत. केलेला बाँड पाळल्याने त्यांचे नूतनीकरण होत नाही, अशा महाविद्यालयातील १८८ जणांचा समावेश आहे. २००१ ते २०११ दरम्यानच्या डॉक्टरांचा समावेश आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. सुनील घाटे यांनी दिली.
 
वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर एक वर्षापर्यंत ग्रामीण भागातील दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून कामकाज करावे लागते. त्यानुसार पुढील प्रमाणपत्र नूतनीकरण होते. डॉक्टरांनी बाँडनुसार सेवा बजावली नाही तर नोंदणी रद्द होते. नोंदणी करण्यासाठी प्रस्ताव दाखल केल्यास नोंदणी होते. परंतु आकारण्यात आलेला दंड भरावा लागतो. शासन दंड का करते की, ग्रामीण भागातील रुग्णांना सेवा मिळावी, हा त्यामागील हेतू आहे. नोंदणी करताच डॉक्टर सेवा बजावत असतील तर त्यांचा समावेश पदवी असूनही बोगस डॉक्टरांमध्ये होतो, असे डॉ. घाटे म्हणाले. 

ग्रामीण भागात न जाण्याची काय आहेत कारणे 
- प्राथमिक आरोग्यकेंद्रात पुरेशी औषधे नसतात. 
- इंटर्नशिप केल्याबरोबर कामाची ऑर्डर मिळत नाही. 
- जिल्ह्याच्या बाहेर मिळाल्याने विद्यार्थ्यांची समस्या. 
- निवासाच्या ठिकाणी पायाभूत सुविधांचा अभाव. 
बातम्या आणखी आहेत...