आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोंदणी केलेल्या २३ शाळांवर कारवाई, शिक्षण विभागाने तयार केला अहवाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शिक्षणहक्क कायद्याप्रमाणे आर्थिक वंचित दुर्बल घटकांसाठी २५ आरक्षित प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी केली नसलेल्या जिल्ह्यातील २३ शाळांची मान्यता काढून घेण्यात येणार आहे. त्याचा अहवाल तयार असून लवकरच वरिष्ठांकडे पाठवणार, असल्याची माहिती शिक्षणाधिकारी वैशाली जामदार यांनी दिली. प्रत्यक्षात २५ टक्के प्रवेशाची आॅनलाइन प्रक्रिया कधीपासून सुरू होईल, असा सवाल पालक वर्गातून विचारला जात आहे.

गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत सूचना नोटिसा देऊनही काही शाळांनी ऑनलाइन नोंदणी केली नाही. संस्थाचालकांचा आडमुठेपणा कारणीभूत ठरत आहे. माढा तालुक्यातील शाळांचा समावेश अाहे. पंढरपूर दोन, बार्शी ३, मंगळवेढा ५, उत्तर सोलापूरच्या शाळांचा समावेश आहे.
वेळापत्रक जाहीर करण्याबाबत शिक्षण संचालक पुणे यांची परवानगी मागितली जाईल. तसेच २५ टक्के प्रवेशाची प्रक्रिया राबविता येणार नाही. कारण जिल्ह्याची प्रवेश प्रक्रिया एकदाच राबविता येते. त्यामुळे फक्त मनपा शिक्षण मंडळासाठी वेगळी प्रक्रिया राबविता येणार नाही. त्यामुळे नोंदणी झाल्यानंतरच प्रवेशाची प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती शिक्षणाधिकारी वैशाली जामदार यांनी दिली.

कारवाई करण्यात येणाऱ्या २३ शाळा
तुळशीदासजाधव प्राथमिक शाळा (वैराग), अभिनव विद्यानिकेतन (वैराग), जिजाई पब्लिक स्कूल इंग्लिश मीडियम (बार्शी), व्हिक्टोरी इंग्लिश स्कूल (माढा), सेंट अँथनी इंग्लिश स्कूल (टेंभुर्णी), आर्या इंग्लिश स्कूल (पिंपळनेर), छारीवाल छोरीया पब्लिक स्कूल (कुर्डुवाडी), आजिनाथ केचे प्राथमिक शाळा (आलेगाव खुर्द), प्रोगेसिव्ह इंग्लिश स्कूल (बेंबळे), राज इंग्लिश स्कूल (मोडनिंब), क्रांती प्रायमरी स्कूल (रोपळे क), इरा पब्लिक स्कूल (उजनीनगर), श्रीगणेश इंग्लिश स्कूल (भंडीशेगाव), विठ्ठल आयडिया इंग्लिश स्कूल (बालाजीनगर), भारत इंग्लिश स्कूल (कात्राळ), कै. कामन्ना माळी गुरुजी इंग्लिश स्कूल (निंबोणी), कै. मेजर रामचंद्र खांडेकर इंग्लिश स्कूल (निंबोणी), पार्वती ताड प्राथमिक शाळा (मंगळवेढा), माऊली इंग्लिश स्कूल (वडाळा), शांताई प्राथमिक विद्यालय, कौसल्या कोठे इंग्लिश स्कूल, शिवपार्वती इंग्लिश स्कूल, कल्याण नगर (उत्तर सोलापूर).
बातम्या आणखी आहेत...