आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्कश हाॅर्न: 25 ट्रकवर कारवाई, प्रेशर हाॅर्न बसवलेल्या दुचाकीस्वारांवरही होऊ शकते कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- प्रेशरहॉर्न बसवून ध्वनिप्रदूषण करणाऱ्या २५ ट्रकवर सोलापूर आरटीओ आणि वाहतूक शाखेच्या पोलिसांनी बुधवारी कारवाई केली. सुमारे २५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई सोलापूर-पुणे महामार्गावरील सावळेश्वर येथे करण्यात आली. या वेळी प्रेशर हॉर्न काढून टाकण्यासाठी पथकाने आपल्यासोबत मेकॅनिकही आणला होता. 

वाहनांच्या कर्कश हॉर्नमुळे ध्वनिप्रदूषणात सातत्याने वाढ होते. वाहनांचे हॉर्न ८० डेसिबलपर्यंत असणे आवश्यक आहे. त्याहून अधिक असल्यास ध्वनिप्रदूषण होते. मोटार वाहन कायद्यातील कलम ११९ नुसार ध्वनिप्रदूषण करणाऱ्या वाहनांना हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. तसेच ट्रकमधील प्रेशर हॉर्न काढून टाकले. ही कारवाई सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार, मोटार वाहन निरीक्षक सचिन बुरुड, मारुती हजारे, वाहतूक पोलिस शाखेचे पोलिस निरीक्षक नलावडे आदींनी केली. 
 
दुचाकी स्वारांवरही लवकरच कारवाई
शहरातीलअनेक दुचाकीस्वार आपल्या वाहनांना जादा आवाजाचे हॉर्न तसेच जास्त आवाज करणारे "सायलेन्सर' बसवतात. अशा वाहनांवरही आरटीओ कारवाई करणार आहे. आरटीओची परवानगी घेता वाहनाच्या मूळ रचनेत बदल करणे हा गुन्हा आहे. 
 
तर विक्रेत्यांवर कारवाई 
प्रेशरहॉर्न, जास्त आवाज करणारे सायलेन्सर यावर कायद्याने बंदी आहे. याचा वापर करून वाहनधारक आवाजाच्या पातळीचे उल्लंघन करत आहेत. यासाठी वाहनधारकांप्रमाणेच ही साधने उपलब्ध करून देणारे विक्रेतेही जबाबदार आहेत. त्यामुळे अशा साधनांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवरही कारवाई करण्याचा इशारा आरटीओने दिला आहे. 
 

कायद्यानुसार प्रेशरहॉर्नला बंदी आहे. प्रेशर हॉर्न वाजवून ध्वनिप्रदूषण करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. तसेच यापुढे लवकरच दुचाकी ध्वनिप्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या साधनांच्या विक्रीवर मर्यादा आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. प्रसंगी विक्रेत्यावरही कारवाई करू.'' 
- बजरंग खरमाटे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी
बातम्या आणखी आहेत...