आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीड हजाराची लाच घेताना फुले महामंडळाच्या दोघांवर कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - किरणा दुकान काढण्यासाठी दोन लाखाचे कर्ज मिळण्याबाबत एका अपंग बेरोजगार तरुणाने अर्ज केला होता. त्याबाबतची फाइल मुंबईला तातडीने मंजुरीसाठी पाठवतो म्हणून महात्मा फुले अंपग वित्त विकास महामंडळ (सामाजिक न्याय भवन अावार, सात रस्ता ) वसुली अधिकारी यांच्यासह दोघांना लाच घेताना अटक करण्यात अाली. ही कारवाई सोमवारी झाली.

वसुली अधिकारी अभिषेक खांडेकर, त्यांचा खासगी साथीदार लक्ष्मण नागप्पा कोळी या दोघांना अटक झाली अाहे. एका अपंग तरुणाला किराणा दुकान काढण्यासाठी दोन लाखांचे कर्ज पाहिजे होते. त्याने फुले विकास महामंडळ कार्यालयात अर्ज केला. तो अर्ज मुंबई कार्यालयात तातडीने पाठवून देतो, असे सांगत दोन हजारांची लाच खांडेकर यांनी मागितली. त्यानुसार अाठ जानेवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार देण्यात अाली. सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.