आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Administration Praper Legislature Council Election

विधान परिषदेसाठी प्रशासकीय लगबग सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - आमदार दीपक साळुंखे यांच्या विधान परिषद सदस्यत्वाची जानेवारी २०१६ रोजी मुदत संपते आहे. सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील या जागेच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय स्तरावर लगबग सुरू झाली आहे.

जिल्हा निवडणूक कार्यालयाने ३७९ मतदारांची प्रारूप यादी निवडणूक आयोगास सादर केली. विधानपरिषद सदस्य निवडीसाठी महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका सदस्य पंचायत समितीचे सभापती हे पात्र मतदार असतील. महानगरपालिकेचे १०२, नऊ नगरपालिकांचे १९४ असे ३६३ सदस्य हे मतदार असतील. मनपाचे स्वीकृत सदस्य ११ पंचायत समितीचे ११ सभापती यांना मतदानाचा अधिकार आहे. असे ३७९ सदस्यांची प्रारूप यादी निवडणूक आयोगाकडे सादर केली.

अक्कलकोट तालुक्यात सर्वाधिक मतदार
पंढरपूर पालिका- ३३, बार्शी पालिका- ३८, अक्कलकोट पालिका- २१, सांगोला पालिका-१८, मैंदर्गी, दुधनी, मंगळवेढा, कुर्डुवाडी करमाळा पालिकेचे प्रत्येकी १७ असे एकूण १९४ मतदार आहेत. अक्कलकोट तालुक्यात सर्वाधिक ५५ मतदारांचा समावेश आहे.