आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Advance, Subsidy Declare To Municipal Corporation Staffs

अॅडव्हान्स, सानुग्रह अनुदान जाहीर - महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिकेच्या कायम कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त पाच हजार रुपये अॅडव्हान्स आणि तीन हजार सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याबाबत महापौर सुशीला आबुटे यांनी आयुक्तांना गुरुवारी पत्र दिले.

दिवाळीनिमित्त मनपा कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान अॅडव्हान्स देण्याची मागणी मनपा कर्मचारी संघटनेने केली होती. त्यानुसार महापौर आबुटे यांनी मनपा पदाधिकारी तसेच आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आज अॅडव्हान्स आणि सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. रोजंदारी, बदलीसेवक, अंगणवाडी सेविका यांना दोन हजार अॅडव्हान्स दीड हजार सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.

जानेवारीपासून सहा टक्के महागाई भत्ता : महापालिकाकर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगातील सहा टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी अॅडव्हान्स आणि सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला असून, तसे पत्र मनपा आयुक्तांना दिले. त्यानुसार रक्कम देण्यात येणार आहे. सुशीला आबुटे, महापौर