आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंच्याहत्तरीनंतर पवारांप्रमाणे तुम्हीही दुप्पट वेगाने बाहेर पडा, फडणवीस यांची टोलेबाजी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - वयाच्या पंच्याहत्तरीनंतर शरद पवार हे वेगाने बाहेर पडले, जिल्ह्या-जिल्ह्यात जाताहेत. ते अामच्या दृष्टीने हितकारक नाही, पण तरीही अामची इच्छा अाहे की, सुशीलकुमार शिंदे यांनीही अाता नवीन ऊर्जा घेऊन बाहेर पडावे लोकांसाठी कार्य करत राहावे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे अमृत महोत्सव सोहळ्यात राजकीय टोलेबाजी केली.
पवार यांनी पंच्याहत्तरीनंतर थोडंसं जपून राहायचं असतं, असा सल्ला शिंदे यांना अापल्या भाषणातून दिला होता. तो धागा पकडून मुख्यमंत्री फडणवीसांनी मार्मिक टोलेबाजी केली. शेतकरी प्रश्नावर पवारांनी जिल्ह्या-िजल्ह्यात जाऊन अांदोलने केली. हा संदर्भ धरून बोलत होते. मंचावर पवार आणि फडणवीस शेजारीच बसलेले होते. इतरांच्या भाषणावेळी दोघेही बोलत होते.
मिळेल ती जबाबदारी पार पाडली : शिंदे
गरिबी, दारिद्र्य यांचे घरी वास्तव्य होते. त्यामुळे पडेल ते काम केले. इच्छा असेल तर मार्ग जरुर दिसतो. त्यामुळे तरुणांनी कष्ट करण्याची तयारी ठेवावी. आपल्या राजकीय जीवनात पत्नी उज्ज्वला शिंदे यांची साथ असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून सोलापूरच्या जनतेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. अापल्या कारकिर्दीत अालेल्या प्रत्येक टप्प्याचा उल्लेख करताना त्यांच्यासमवेत त्या त्या काळात काम केलेल्या सहकाऱ्यांचाही त्यांनी परिचय करून दिला. लहान असताना मी दोन मुली सांभाळण्याचे काम करीत होतो, त्या दोघीही अाज उपस्थित असल्याचे सांगताना त्यांनी वकिली, पोलिस उपनिरीक्षक, कोर्टात पट्टेवाला म्हणून सेवेत असतानाचे काॅलेज मध्ये शिकत असतानाचे त्यांचे तत्कालीन सहकारीही बसलेले होते. त्यांचाही त्यांनी अावर्जून उल्लेख केला. पोलिसात असताना मला सीअायडीकडे सेवा दिली होती, शरद पवार हे नेते होते, ते काय करतात हे पाहण्यासाठी मी जात असे, तसे ते मुरब्बी धोरणी अाहेत, ते कधीही कोणाची चड्डी अोढू शकतात, असा उल्लेख शिंदे यांनी करताच एकच हशा पिकला.
पुढे वाचा...
> शिंदे हे पदाने मनानेही मोठे : फडणवीस
>शिंदे हे नव्या पिढीसमोरील आदर्श : पवार
>ताफा गेल्यानंतर पोलिस झाले रिलॅक्स
>सोनियांचे पत्र
बातम्या आणखी आहेत...