आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ममता कुलकर्णीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर एव्हॉनची पुन्हा तपासणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - उत्तर सोलापूर येथील चिंचोळी-एमआयडीसीतील एव्हॉन कंपनीतील इफेड्रीन अमली पदार्थ प्रकरणात शनिवारी सिनेअभिनेत्री ममता कुलकर्णीविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यामुळे या घटनेला महत्त्व आले आहे. ठाणे पोलिसांनी रविवारी सकाळी सोलापुरात येऊन एव्हॉन कंपनीची तपासणी करून कर्मचाऱ्यांचा जबाब घेतला. ठाणे गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त भरत शेळके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक उत्तम शेळके यांच्यासह चार पथके आली होती. तीसहून अधिक जणांचा पुन्हा जबाब नोंदवला. सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजय कुंभार यांनी ठाणे पोलिसांची भेट घेतली. सहायक आयुक्त शेळके म्हणाले, दहा आरोपींना अटक झाली आहे. चौघांविरुद्ध ठाण्याच्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल झाले आहे. उर्वरित सहाजणांविरुद्ध लवकरच आरोपपत्र दाखल होईल. ममता कुलकर्णी, विकी गोमास्वी यांच्यासह सातजणांना अटक करण्यात येणार आहे. त्यात आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया डॉ. अब्दुल्ला याचा समावेश आहे. आणखी एक मुख्य सूत्रधार पुनीत श्रींगी याला गुजरात एटीएसने ताब्यात घेतले आहेत. तपास किचकट आहे. यासाठी विविध पथके काम करीत आहेत.
ममता कुलकर्णी केनियात ?
सिनेअभिनेत्री ममता कुलकर्णी केनियामध्ये असल्याची माहिती पोलिस तपासात पुढे येत आहे. तिचा पती विकी गोस्वामी अजून गायबच आहे. जानेवारी २०१६ रोजी केनियात आंतरराष्ट्रीय ड्रग माफियांची बैठक झाली होती. त्यासाठी ममताने पुढाकार घेतल्याचे तपासात समोर आले आहे. ममता विकी यांच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात येणार असल्याचे ठाणे पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांनी शनिवारीच जाहीर केले आहे.
रेड कॉर्नर नोटीस म्हणजे काय?
एखाद्यासंशयित व्यक्तीस एका देशातून दुसऱ्या देशात येण्या-जाण्यासाठी बंदी असते. रेड कॉर्नर नोटीस जारी झाल्यास कुठल्याही विमानतळावर त्या व्यक्तीस ताब्यात घेऊन संबंधित देशाला माहिती दिली जाते. जेणेकरून आरोपीला देशाबाहेर जाता येत नाही. ही प्रक्रिया खूप उच्च पातळीवर राबवली जाते. इंटरपोलची यंत्रणा यासाठी काम करते.
छायाचित्र: चिंचोळी एमआयडीसी भागातील एव्हॉन कंपनीत रविवारी सकाळी ठाण्याचे सहायक पोलिस आयुक्त भरत शेळके वरिष्ठ पोलिस निरीक्षक उत्तम शेळके यांनी कर्मचाऱ्यांचा जबाब घेतला. छाया: रामदास काटकर
बातम्या आणखी आहेत...