आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाईंच्या नावामुळे लिंगायत नाराज; फडणवीसांचे पुतळे जाळणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- लिंगायत समाजाची सोलापूर विद्यापीठाला सिद्धेश्‍वरांचे नाव देण्याची मागणी होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात बोलताना विद्यापीठाला अहिल्याबाईंचे नाव दिल्याची घोषणा केल्याने लिंगायत समाजाने निषेधाची भूमिका घेतली आहे. शिवा संघटनेचे अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी फडणवीस यांची पुतळे ठिकठिकाणी जाळणार असल्याचे म्हटले आहे. 
 
सोलापूर विद्यापीठाला महात्मा बसवेश्‍वरांचे नाव देण्याची मागणी लिंगायत समाजाने सुरवातीला केली होती. त्याबरोबरच अहिल्याबाईंचे नाव द्या, अशीही मागणी झाली होती. हा विषय अनेक वर्षे थंड होता, मात्र पावसाळी अधिवेशनात यावर चर्चा झाल्याने तो पुन्हा पेटला. सोलापुरात धनगर समाजाने अहिल्याबाईंच्या नावासाठी मोठा मोर्चा काढला. त्यानंतर शिवा संघटनेने लिंगायक समाजाला संघटित करुन मोठा मोर्चा काढला. सोलापूरचे ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्‍वरांचे नाव देण्याची मागणी केली. या मोर्चाला मोठ्या संख्येने लिंगायत नेते उपस्थित होते. 
 
दरम्यान, रविवारी नागपुरात देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्याबाईंचे नाव दिल्याची घोषणा केली. या घोषणेचे धनगर समाजाने स्वागत केले, मात्र लिंगायन समाजाने निषेधाचा सूर आळवला आहे. शिवा संघटनेचे अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी फडणवीसांच्या घोषणेला विरोध करुन त्यांचे पुतळे जाळण्याची घोषणा केली आहे. 
बातम्या आणखी आहेत...